प्राध्यापकांचे आज पुण्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने पीएच. डी.धारकांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ लागू करूनही राज्य सरकारच्या निर्णयात १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढ अमान्य करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्‍टो) आंदोलन सुरू केले आहे. महासंघातर्फे उद्या (ता. २४) दुपारी बारा वाजता पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार आहेत.

नाशिक - केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने पीएच. डी.धारकांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ लागू करूनही राज्य सरकारच्या निर्णयात १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढ अमान्य करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्‍टो) आंदोलन सुरू केले आहे. महासंघातर्फे उद्या (ता. २४) दुपारी बारा वाजता पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार आहेत. महासंघातर्फे १ जुलैला मुंबईत, तर २२ जुलैला दिल्लीत धरणे धरण्यात येणार आहेत. मुंबईतील आंदोलना वेळी महासंघाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor Agitation in Pune