ऑनलाइन व्यवहाराचे बदल आत्मसात करा - चंद्रशेखर ठाकूर

The program was organized in Yeola about online transactions
The program was organized in Yeola about online transactions

येवला - डिजिटल व्यवहाराविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. मात्र या व्यवहारात घाबरण्याचे कारण नसून पीओएस (स्वप), भीम एप, मोबाईल बँकिंगने घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य आहे. पुढील चार-पाच वर्षात सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने सगळे बदल आत्मसात करा. भौतिक सुविधा रातोरात होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, आता डिजिटलची सुरवात आहे. फक्त शिकवण्याची गरज आहे असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. 

'सकाळ' व दि. येवला मर्चंट्स को. ऑप बँकेच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात शनिवारी आयोजित गो-कॅशलेस याविषयी व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष राजेश भांडगे, जेष्ठ संचालक सुशीलचंद्र गुजराथी, संचालक मनोज दिवटे, अरुण काळे, सीए किरण बनकर, प्रशांत गुप्ता, सकाळचे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील आदी उपस्थित होते. तर बँकेचे अध्यक्ष पंकज पारख यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले. व्याख्याते श्री. ठाकूर यांचा परिचय 'सकाळ'चे सहायक वितरण अधिकारी अभिजीत गरुड यांनी केला.

यावेळी बोलतांना राजेश पाटील म्हणाले की, ही व्यापारी पेठ असून चळवळीचे गाव आहे. त्यामुळे आम्ही येथील बँकींग व व्यापारी क्षेत्रासाठी कॅशलेस व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन समाजोपयोगी उपक्रम नेहमी सकाळ राबवते. नोटाबंदी नंतर व्यवहारात मोठे परीवर्तन झाले आहे, ते समाजाला कळावे यासाठी येथे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यासाठी मर्चंट बँकेचे मोठे सहकार्य मिळाले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

श्री. ठाकूर म्हणाले कि, डिजिटल क्रांती आता रुजू लागली असून मोठ्या शहरात पीओएस मशीन चहा, पान टपरीवर सर्वच दुकानात असल्याने ग्राहक व दुकानदार यांची सोय झाली. मुंबईत तर पोलिसही पीओएस वापरत आहेत. यामुळे ९५ टक्के व्यवहार नोटाशिवाय शक्य आहे. फक्त समाजाने या बदलाकडे गरज म्हणून पहावे असे सांगितले. यावेळी त्यांनी भीम अँप, इंटरनेट बँकिंगच्या वापराची माहिती स्लीइड शो द्वारे स्पष्ट केली. डोक्यात भाऊगर्दी झाली की रस निघून जातो म्हणून एकएक पद्धती समजून घ्या असे सांगत रोकडविरहित व्यवहार करण्यासाठी वॉलेट मनी ही संकल्पना रुजू लागली आहे. वॉलेट मनी म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, त्याचे फायदे-तोटे, समज-गैरसमज ठाकूर यांनी उलगडवून सांगितले.

डिजिटल व्यवहारात हॅकिंगची भीती बाळगत फसवणूक होते म्हणून डिजिटल व्यवहार करण्यास घाबरतात. मात्र तांत्रिक साक्षरता वाढल्याने भीतीचे कारण नाही. अकाऊंट हॅक होण्याचा प्रकार हा लाखामध्ये एखादा असतो आणि तोही ग्राहकाच्या चुकीमुळे होत असतो. आपल्या अकाउंटची माहिती ही कधीही फोनवर देऊ नये, अकाउंट हॅक होण्याची किंवा फसवणूक होण्याची भीती वाटत असेल तर व्यक्तीने स्वत:कडे दोन अकाउंट ठेवावीत. ज्या बँकेच्या खात्यातून डिजिटल पेमेंट करायचे आहे, त्यामध्ये पाच हजाराच्यावर रक्कम ठेऊ नये, एटीएम मधून येणारी पावती फेकू नका,
त्यामुळे ही पावती फाडून टाका. पासवर्ड लक्षात येईल अशा ठिकाणी लिहू नका असा सल्ला त्यांनी दिला. फेसबुक व व्हाटस अॅप म्हणजे एक प्रकारची सूरी असून यावरील मेसेज द्वारे बुद्धिभेद होतात असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी यांनी केले. बँक लवकरच एटीम सुरू करणार आहे. बँकेचे हे हिरक महोत्सवी वर्ष असून भविष्यात अजून दिशादायी कारभार बँक करणार आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक साहेबराव सैद, किशोर सोनवणे, संजय सोमासे, अमित पटेल, रघुनाथ खैरणार, अशोक कुळधर,
विजय खैरणार, धीरज परदेशी, सागर वडे, नंदकुमार राहणे, व्यवस्थापक अतुल पटेल, चंद्रमोहन मोरे, आबा आरखडे, सुरेश मढवई आदी उपस्थित होते. आभार बातमीदार संतोष विंचू यांनी मानले. सकाळचे वितरण प्रतिनिधी अमित पवार, बातमीदार प्रमोद पाटील, संतोष घोडेराव, सुदाम गाडेकर, सतीश गायकवाड, बापूसाहेब वाघ यांनी संयोजन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com