नववर्षात 'प्रोजेक्ट गोदा'चा नारळ फुटणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण थांबविण्याबरोबर गोदावरीचे सुशोभीकरण होणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर जानेवारीत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे. 

नाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण थांबविण्याबरोबर गोदावरीचे सुशोभीकरण होणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर जानेवारीत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे. 

स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (ता. 25) बैठक घेतली. तीत प्रोजेक्‍ट गोदाचे सादरीकरण करण्यात आले. प्रोजेक्‍ट गोदासाठी पहिल्या टप्प्यात 74 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, हरित, धार्मिक व खुले क्षेत्र विकास अशा तीन टप्प्यांत प्रोजेक्‍ट गोदा साकारला जाणार आहे. यापूर्वी प्रोजेक्‍ट गोदासाठी दोनदा निविदा काढल्या. मात्र, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेटचा त्यात अंतर्भाव असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेत एकाच कंपनीने सहभाग नोंदविल्याने ती निविदा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रोजेक्‍ट गोदामधील महत्त्वाचे टप्पे 
पहिला टप्पा
: रामवाडी ते टाळकुटेश्वर पूल या दोन किलोमीटरच्या टप्प्यातील गाळ काढणे, ट्रॅश स्किमर तंत्राद्वारे हायड्रोलिक यंत्राचा वापर करून पाणवेली व कचरा काढणे, नदीकाठावर पदपथ, सायकल ट्रॅक, जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे. 

दुसरा टप्पा : अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बांध हटविणे व स्वयंचलित यांत्रिक दरवाजे बसविणे, हवेच्या दाबावर दरवाजे नियंत्रित करणे. 
तिसरा टप्पा : गोदापार्क विकसित करणे यात ऍम्फी थिएटर, वॉक-वे, ऍक्‍युप्रेशर पाथवे, उपाहारगृह, वॉटर कॅसकेड, दगडी बाके, सायकल मार्ग, बोर्डेक्‍स मिरर इफेक्‍ट, वॉटर प्रोजेक्‍शन स्क्रीन, हेरिटेज वॉक, जेट्टी, वृक्षारोपण, ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देणे.

Web Title: Project Goda Will starts in New Year