मालमत्ताकर थकबाकीदारांच्या नावांचे फलक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

जळगाव - जळगाव महापालिकेतर्फे विविध प्रभागातील मोठ्या 50 थकबाकीदारांच्या नावाची यादी आजपासून जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्यात आली,प्रभाग क्रमांक एकची यादी महापालिकेसमोर लावण्यात आली आहे.

जळगाव - जळगाव महापालिकेतर्फे विविध प्रभागातील मोठ्या 50 थकबाकीदारांच्या नावाची यादी आजपासून जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्यात आली,प्रभाग क्रमांक एकची यादी महापालिकेसमोर लावण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे घरपट्टी वसुलीची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. यात शहरातील मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत चारही प्रभागातील मोठ्या पन्नास थकबाकीदारांची नावे काढली आहेत. जनतेच्या माहितीसाठी जाहीर फलकावर ही यादी त्यांच्या प्रभागात लावण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक एक मधील मोठ्या पन्नास थकबाकीदारांची यादी आज महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर लावण्यात आली आहे.असेच नावाचे फलक शहरातील इतर भागात लावण्यात येणार आहे.या थकबाकीदारांनी आपली थकबाकी जमा केली नाही तर त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

वसुली पथक
मार्च महिनाअखेर असल्याने महापालिकेतर्फे घरपट्टीचे वसुलीसाठी पथक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात थकबाकीदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. त्यानंतरही त्यांनी आपली घरपट्टी जमा न केल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे मोठे थकबाकीदार, व्यावसायिक,मोबाईल टॉवर, अनधिकृत इमारती या चार भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. त्यांनी थकबाकी भरल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

महापालिकेने जनतेच्या माहितीसाठी जाहीर फलक लावून थकबाकीदारांना संधी दिलेली आहे. त्यांनी सात दिवसात रक्कम जमा न केल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल.
- जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका जळगाव

Web Title: property tax arrears name board