कॉलेज रोडला स्पामध्ये देहविक्रय; पोलिसांचा छापा, सहा मुली ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नाशिक - कॉलेज रोडवरील इजीडे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी व्यावसायिक संकुलात सुरू असलेल्या स्पाच्या नावाखाली देहविक्रयच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी व्यवस्थापक मुलीसह सहा मुलींना ताब्यात घेतले असून, या स्पाच्या मालकालाही गजाआड केले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाऱ्या मुलींची सुटका केली होती.  

नाशिक - कॉलेज रोडवरील इजीडे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी व्यावसायिक संकुलात सुरू असलेल्या स्पाच्या नावाखाली देहविक्रयच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी व्यवस्थापक मुलीसह सहा मुलींना ताब्यात घेतले असून, या स्पाच्या मालकालाही गजाआड केले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाऱ्या मुलींची सुटका केली होती.  

कॉलेज रोडवर हॉलमार्क चौक असून, येथील इजीडे मॉलच्या समोरच ठक्कर मॅजेस्टी हे व्यावसायिक संकुल आहे. या संकुलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध शाखांचे क्‍लासेस चालतात. त्याशिवाय व्यावसायिक दुकाने आहेत. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एन्झी स्पा-बॉडी टॅट्यू असून, या ठिकाणी देहविक्रय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली. आज सायंकाळी एकाला बनावट ग्राहक म्हणून स्पामध्ये 

पाठविले आणि देहविक्रयची खात्री केली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास स्पावर धाड टाकली. या ठिकाणी सहा मुली आढळून आल्या. यातील एक मुलगी स्पामध्ये व्यवस्थापिका होती. त्याशिवाय आतमध्ये एक ग्राहकही आढळला. स्पा सेंटरचा मालक हेमंत परिहार (वय ३२, रा. परम निवास, कल्पतरूनगर, अशोका मार्ग) यालाही पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही त्याच्यावर मुलींकडून देहविक्रय करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या सेंटरमध्ये छोटेखानी पाच खोल्या असून, त्यामध्ये बॉडी मसाज-स्पाच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे आणि पोलिसांनी कारवाई केली. 

माहिती मिळाल्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यात स्पाचालकासह सहा मुलींना ताब्यात घेण्यात आले असून, यातील मुली महाविद्यालयीन युवती असण्याची शक्‍यता आहे. 
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

अवैध धंदे फोफावले
कॉलेज रोड परिसरात काही महिन्यांमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. रॉलेट जुगारापासून ते मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम अवैध धंदे सुरू असून, देहविक्रयचाही व्यवसाय फोफावला आहे. विशेषत: याच परिसरात महाविद्यालय व नामांकित क्‍लासेस आहेत. महाविद्यालयीन युवतींचाही वापर यासाठी केला जात असल्याची चर्चा नेहमीच असते; परंतु पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अवैध व्यावसायिकांची मुजोरीही वाढली आहे.

Web Title: prostitution business in spa center