पर्यावरणरक्षण, पाणी वाचवा अन्‌ महिला सक्षमीकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

नाशिक - गणेशोत्सव म्हणजे मांगल्य आणि आनंदाचे पर्व. या मंगलपर्वातील हे दहा दिवस म्हणजे सर्वांनाच भारावून टाकणारे असतात. त्यामुळेच बाप्पाचे दर्शन, आरास पाहण्यासाठी कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या मोठी असते. हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा या उपक्रमात प्रबोधन, जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे.

नाशिक - गणेशोत्सव म्हणजे मांगल्य आणि आनंदाचे पर्व. या मंगलपर्वातील हे दहा दिवस म्हणजे सर्वांनाच भारावून टाकणारे असतात. त्यामुळेच बाप्पाचे दर्शन, आरास पाहण्यासाठी कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या मोठी असते. हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा या उपक्रमात प्रबोधन, जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे.

या अनोख्या उपक्रमाचे घोटी- धामणगाव मार्गावर असलेल्या श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात (एसएमबीटी) हॉस्पिटल हे प्रायोजक आहेत. गणेश मंडळांनी स्वच्छता व पर्यावरणपूरक विषयांवरचे देखावे, तसेच परिसरात स्वच्छतेबाबत अथवा पर्यावरण केलेल्या कामाची नोंद या स्पर्धेत घेतली जाईल. मंडळांनी ‘सकाळ’ शहर कार्यालय, ठक्कर बझार येथे नोंदणी करावी. विजेत्यांना प्रथम- सात हजार एक, द्वितीय- पाच हजार एक, तृतीय- तीन हजार एक व उत्तेजनार्थ पाच जणांना (एक हजार एक रुपये) पारितोषिक दिले जाईल.

आमच्या मंडळातर्फे पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते. मूर्ती पाण्यात विसर्जित न करता ती दान करतो. इतरांनाही मूर्तिदान करण्यासाठी प्रवृत्त करतो. यंदा ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ हा देखावा सादर करणार आहे. दहा दिवस महिला सक्षमीकरण, तसेच पर्यावरणरक्षणाविषयी जनजागृती केली जाईल.

- शैलेश कुलकर्णी, अध्यक्ष, युनिक ग्रुप

गणेशोत्सवात पाणीबचतीविषयी मोहीम राबविणार आहोत. ‘पाणी वाचवा-पाणी जिरवा’, ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा संदेश भाविकांपर्यंत पोचवणार आहोत. परिसर स्वच्छ ठेवून खऱ्या अर्थाने ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा मोहीम जनमानसात रुजविणार आहोत. 

- अमित नडगे, जय शंभो भवानीप्रणीत भरत मित्रमंडळ

‘क्‍लीन’ बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा’ हा ‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आमच्या मंडळातर्फेही गणेशोत्सवात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात कलानगर परिसरात वृक्षारोपण करणार आहोत. आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. 

- प्रशांत हिरे, अध्यक्ष, कलानगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ

गणेशोत्सवात स्वच्छतेविषयी जनजागृतीवर जास्तीत जास्त भर देणार आहोत. भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटविण्याबरोबरच परिसरात पुन्हा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. निर्माल्य नदीपात्रात टाकू नये, गोदावरीचे प्रदूषण करू नये, यासाठी कार्यकर्ते काम करतील.

- रवी रकटे, अर्जुन कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, द्वारका

Web Title: Protect the environment, save water and women's empowerment