अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा

संजीव निकम
शनिवार, 24 मार्च 2018

शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. शिवस्फूर्ती मैदानातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यावर पोलीस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी महिलांना समोर गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले.

नांदगाव : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. शिवस्फूर्ती मैदानातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यावर पोलीस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी महिलांना समोर गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले. स्मिता दंडगव्हाळ, संगीता सोनवणे, प्रशांत शर्मा, संजय मोकळं, आकाश हिरे, किरण शिंदे यांनी केले.

गेल्या आठवड्यात अविनाश सरग याने घरच्या बाहेरील अंगणात खेळात असलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी त्याला अटक होऊन त्याची रवानगी नाशिकच्या बालसुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले. आमदार जयवंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.

आज दुपारी पीडित मुलीच्या न्यायासाठी शहरातील विविध भागातील महिलांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला. या मोर्चात माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, होलार समाज संघटनेचे सुनील जाधव, भाजप शहराध्यक्ष उमेश उगले, निलेश पगारे,संजय मोकळ, संजय कदम, वाल्मिक जगताप, भीमशक्ती संघटनेचे मनोज चोपडे, सचिन देवकते, संगीता वाघ, संगीता सोनवणे, तुषार पांडे, होलार समाज संघटना, विश्वकर्मा सुतार संघटना, किरण शिंदे, सुमित सोनवणे यांचेसह संगीता वाघ, संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, लता जाधव, शाहीन काझी, उषा शिंदे, अनिता गांगुर्डे, शुभांगी पांढरे, मुमताज शेख, ज्योती मोरे, सुनीता सूर्यवंशी, कविता तायडे, कावेरी शर्मा, ज्योती मोरे, शालिनी पगारे,अनिता मोरे, ज्योती सोनवणे,रेखा पाठक, सुलोचना ननावरे, सुवर्णा सोनवणे, विठाबाई महाजन, नंदाबाई मोरे, गंगुबाई शिंदे, संगीता शिंदे, सुशीला निकम, तृप्ती त्रिभुवन रुतीका नेमनर,श्रद्धा पिंगळे आदींसह शहरातील विविध भागातील महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या नराधमाला फशीची शिक्षा द्या कठोर कारवाई कार, त्यास जामीन देऊ नका, त्याचे वकीलपञ कोणी घेऊ नये अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या 

 

Web Title: A protest against the sexual assault of a minor girl