म्हैसाळच्या पाणीप्रश्नावरून आंदोलकांना रात्र काढावी लागली थंडीत

गुरूदेव स्वामी
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

आंदोलकाना निवेदन देताना आम्ही आठ दिवसांत पाणी सोडण्याबाबत सांगितले होते. जत व सांगोला तालुक्यातून पाणी येणार असून, अंतर जास्त असले तरी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. दोन-तीन दिवसांत यश येईल.

- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता

भोसे : म्हैसाळचे पाणी तालुक्याच्या दुष्काळी भागाला मिळावे म्हणून करून गटाच्या जिल्हा सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदगी तलावातच सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात पहिल्या दिवशीची रात्र आंदोलकांना निर्मनुष्य ठिकाणी थंडीत काढावी लागली. सुरक्षा व्यवस्थाही सक्षमपणे ठेवली नाही. याबाबत या भागातील जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या दुष्काळाची भीषणता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, जनावरांचे चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पण प्रशासनाकडून म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यासाठी अनेकवेळा दिलेल्या तारखा पाळल्या नसल्याने जि.प.सदस्या गोडसेंनी आंदोलकाचे हत्यार उपसले. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या भागात म्हैसाळचे पाणी येणारच नाही, अशी मानसिकता या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये होऊ लागली.

एका बाजूला हे पाणी येणारच आहे, असे सांगितल्यावरही या भागातील शेतकरी आता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जोपर्यंत शिरनांदगी तलावात म्हैसाळ योजनेच्या मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी तलावात येत नाही. तोपर्यंत शिरनांदगी तलावामध्ये आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जि.प.सदस्या गोडसे या येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नसतानाही एका महिलेने या भागातील पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे या भागातील नागरिकाचा पाठिंबा मिळू लागला

Web Title: The protesters were forced to leave the night after the Mhaisal water dispute