पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ येवल्यात नागरिकांचा मूक मोर्चा

yeola
yeola

येवला : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांसह दहशतवादाचा बिमोड प्राधान्याने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील विंचूर चौफुलीवरून सकाळी १० .३० ला मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चाचा समारोप टिळक मैदानात करण्यात आला. या ठिकाणी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजलीपर भाषणे आली. यावेळी माणिकराव शिंदे यांनी देशवासीयांनी दहशतवादाविरूध्द लढण्यासाठी पुढे येत एकजूटीने राहण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले. 

यावेळी पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, संभाजी पवार, बंडू क्षिरसागर, संजय सोमासे, धिरजसिंह परदेशी, नानासाहेब शिंदे, आनंद शिंदे, शहर काझी राफीयोद्दीन, सुभाष पाटोळे, अविनाश कुक्कर, बापू जाधव, किरण परदेशी, राहुल लोणारी, नानासाहेब लहरे, युवराज पाटोळे, प्रविण बनकर, दिनेश आव्हाड, रतन बोरनारे, झुंजार देशमुख, राजुभाऊ लोणारी, प्रशांत शिंदे, प्रमोद सस्कर, धनंजय कुलकर्णी, दिपक लोणारी, दयानंद जावळे, भास्कर कोंढरे, विजय श्रीश्रीमाळ, गणेश दोडे, मकरंद तक्ते, विजय गोसावी, बालू गायकवाड, शेरू मोमीन, अझहर शेख, संजय कासार, शरद लहरे, गणेश खळेकर, गणेश गायकवाड, आबासाहेब शिंदे, वसंत पवार, मंगलसिंग परदेशी, ज्ञानेश्वर भागवत, एकनाथ गायकवाड, शाम गुंड, अरुण काळे, विजय कदम, श्रीकांत पारीख, शरद रंधे, प्रविण गायकवाड, दिनेश परदेशी आदींसह शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com