गुणवंत अधिकारी पुरस्कार सुखदेव बनकर यांना प्रदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नाशिक - मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या यशवंत पंचायत राज अभियानांतर्गतच्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांना आज गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते. 

विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक किरण माळवे यांना "गुणवंत कर्मचारी पुरस्कार' देण्यात आला. मूळचे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या माळवे यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये चार वर्षे कामकाज सांभाळत एक वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी अपंग कल्याण, सिंहस्थ कुंभमेळा यासह वनराई बंधारे, एक दिवस शाळेसाठी आणि "सकाळ माध्यम समूहा'च्या "अधिकारी व्हायचयं मला' यामध्ये सक्रिय सहभाग दिला आहे. या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांनी सन्मानित केले आहे.

Web Title: Provide the meritorious award Sukhdev bankar