...अन्‌ रामभाऊंच्या ‘हॅलो’ने जाधव कुटुंबीयांचे चेहरे खुलले

Rambhau-Jadhav
Rambhau-Jadhav

पिंपळगाव बसवंत - पुलवामात १४ दिवसांपूर्वी जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचे साक्षीदार निफाडचा भूमिपुत्र रामभाऊ जाधव आहेत. पुलवामा घटनेच्या दिवशी रामभाऊ महामार्गावर कर्तव्य बजावत होते. दहशतवाद्यांनी घडविलेल्या आरडीएक्‍सच्या स्फोटानंतर बसचे अवशेष त्यांच्या उजव्या पायावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. १४ दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने रौळस पिंप्री (ता. निफाड) येथील जाधव कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अखेर १४ दिवसांनंतर रामभाऊसमवेत बोलणे झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

रामभाऊ मधुकर जाधव २००६ मध्ये सैन्यात दाखल झाले. सध्या ते पुलवामा येथे कर्तव्य बजावत होते. चार दिवसांतून कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क व्हायचा. पण त्या घटनेनंतर रामभाऊ यांच्याशी जाधव कुटुंबीयांचे बोलणे होऊ शकले नाही. वारंवार प्रयत्न करूनही रामभाऊ यांच्याशी बोलणे 
होत नसल्याने जाधव कटुंबीय चिंतातुर होते.

नारायण, मी सुखरूप आहे!
रामभाऊ यांचे लहान बंधू नारायण यांनी बुधवारी (ता. २७) सकाळी पुन्हा संपर्क केला. त्या वेळी रामभाऊ यांचा भ्रमणध्वनी खणखणला. ‘नारायण, मी सुखरूप आहे... घरी सर्वांना सांग, काळजी करू नकोस,’ असे शब्द रामभाऊ यांच्याकडून ऐकायला येताच नारायणसह कुटुबीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तणावाची स्थिती कायम असल्याने नेटवर्क नसल्याचा खुलासा रामभाऊ यांनी केला व त्या दिवशी थरकाप उडविणाऱ्या या घटनेचा क्रम स्पष्ट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com