पुण्यातील बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक 

आनन शिंपी
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चाळीसगाव- सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात बिल्डर व्यवसायात कार्यरत असलेल्या मूळ हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी बिल्डरने प्लॉट्‌सची विक्री करताना अनेकांना गंडा घालून कोट्यवधींना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात आज पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या बिल्डरने सुमारे 150 कोटींना गंडा घातला असावा, अशी शक्‍यता फसवणूक झालेल्यांनी व्यक्त केली आहे. 

या संदर्भात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हरिंदर पालसिंग आनंद (वय 58, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2011 मध्ये त्यांना दीपक यशवंत पाटील यांना अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घ्यायचा होता. त्यानुसार, त्यांना धर्ती इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीच्या बाणेर (पुणे) येथील प्रकल्पाची माहिती मिळाली. श्री. आनंद यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या साइटवर भेट दिली. त्यावेळी बिल्डर दीपक पाटील यांनी अकरा मजल्याची रीतसर परवानगी असलेली इमारत उभी करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भातील नकाशे व इतर कागदपत्रेही दाखवली. त्यामुळे श्री. आनंद यांनी त्यावर विश्‍वास ठेवून दहाव्या मजल्यावरील 1002 क्रमांकाचा फ्लॅट बुक केला. या फ्लॅटचा ताबा 2014 मध्ये देण्याचे आश्‍वासन दिले. बुकिंगसाठी दीपक पाटील यांनी श्री. आनंद यांच्याकडे फ्लॅटचे पूर्ण पैसे मागितल्यानंतर त्यांनी 66 लाख 85 हजार 231 रुपयांचा धनादेश "धर्ती इन्फ्रास्ट्रक्‍चर' नावाने दिला. श्री. आनंद त्यांनी माहिती घेतली असता, यासाठी केवळ सातच मजल्यापर्यंत परवानगी मिळालेली असल्याचे समजले. त्यावर दीपक पाटील यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी लवकरच अकराव्या मजल्याची परवानगी मिळेल, असे खोटे सांगितले. 

एकूणच या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिंदर आनंद यांनी दीपक पाटील यांनी खोटे नकाशे व दस्तावेज दाखवून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. 

चाळीसगावातील अनेकांची फसवणूक 
प्राप्त माहितीनुसार, बिल्डर दीपक पाटील यांचे पुण्यात बाणेर व बालेवाडी येथे दोन स्वतंत्र प्रोजेक्‍ट आहेत. त्यांच्याकडे चाळीसगावातील भूलतज्ज्ञ डॉ. मंगेश वाडेकर, रवींद्र कुमावत यांच्यासह जळगाव, धुळे, नाशिक येथील बऱ्याच जणांनी फ्लॅटचे बुकिंग केले आहे. या सर्वांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे फ्लॅट न मिळाल्याने या सर्वांची फसवणूक झाली आहे. 

Web Title: Pune fraud builder thousands customers cheated