पुण्याच्या समर्थ अकादमीच्या "सेकंड हॅंड'ने पटकावला बाबाज्‌ करंडक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - बाबाज्‌ थिएटर आणि एबीसीएल फिल्म प्रॉडक्‍शन ऍण्ड इन्स्टिट्यूटतर्फे झालेल्या बाबाज्‌ करंडक एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या समर्थ अकादमीच्या "सेकंड हॅंड' एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. कल्याणच्या अभिनय संस्थेच्या "दर्देपोरा'ने द्वितीय, तर मैत्रीय कलामंच, डोंबिवली येथील "बोन्साय'ने तृतीय क्रमांक पटकावला. 

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज "बाबाज्‌ करंडक' एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, सामाजिक कार्यकर्त्या व निर्मात्या गीता कपूर, नगरसेवक उद्धव निमसे, एबीसीएल फिल्म प्रॉडक्‍शन ऍण्ड इन्स्टिट्यूटचे दिग्दर्शक आनंद बच्छाव, ऍड. विजया माहेश्‍वरी, ऍड. शुभांगी कडवे, बाबाज्‌ थिएटरचे प्रशांत जुन्नरे, प्रकाश साळवे आदी उपस्थित होते. श्री. जोशी, श्रीमती कपूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विजय खानविलकर, देवेन कापडणीस, श्रीया जोशी परीक्षक होते. 

बाबाज्‌ करंडकमध्ये एकूण 26 एकांकिका सादर झाल्या. यामध्ये नातेसंबंध, पर्यावरण, सामाजिक असे विविध विषयांचे सादरीकरण झाले. स्त्री अभिनयाचे पारितोषिक वैशाली खाटकमारे (12 किलोमीटर), देवयानी मोरे (सेकंड हॅंड), सोनाली मोरे (दर्देपोरा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. पुरुष अभिनयाचे पारितोषिक मयूर निमकर (बोन्साय), विक्रम पाटील (सेकंड हॅंड) आणि प्रतीक पवार (अक्रय) यांना विभागून, शुभम खरे (पाझर) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले. प्रकाश योजनेत विराज जयवंत (दर्देपोरा), चेतन ढवळे (पाझर), विशाल वाघमारे (बोन्साय) यांना गौरविण्यात आले. संगीताचे पारितोषिक राजेश पंधे, राहुल शिरसाठ (दर्देपोरा), प्रतीक नाईक (फुगडी), अर्जुन टाकरस (पाझर) यांना देण्यात आले.

Web Title: Pune samarth Academy won the second hendane babaj Trophy