नवापुरकरांना मिळणार 50 पैशात एक लिटर शुद्ध पाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नवापूर - पाच टक्के पेसा अंतर्गत आर. ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प सात लाख 50 हजार रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. प्रती तास दोन हजार लिटर शुध्दपाणी गावाला मिळेल. मोबाईलसारखे रिचार्ज एटीएम सिस्टिम आहे. 50 पैसे लिटर तसेच लग्नासह इतर कार्यक्रमासाठी थम्सची सुविधा केली आहे. शुद्ध पाण्यामुळे गावाचे आरोग्य चांगले राहील असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना नाईक यांनी सांगितले. 

नवागाव (ता. नवापूर) येथे आर. ओ. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समितीच्या सभापती सविता गावित, जिल्हा परिषद सदस्या मालती नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळू नाईक, छगन वसावे, शेतकी संघाचे सभापती अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दीपक नाईक, सरपंच शर्मिला नाईक, माजी सरपंच प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी किरण गावित उपस्थित होते. 

सौ. नाईक म्हणाल्या, पुढील वर्षात डोकारे व सुकवेल येथे आर. आर. प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हे प्रकल्प एक हजार लिटर क्षमतेचे असणार आहे. आरोग्यासाठी ग्रामस्थांनी शौचालयाचे वापर अधिकाधिक करावा तसेच एक मे ला नवापूर येथील गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे राष्ट्रीय सत्संग होणार आहे. त्याला लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी 80 टक्के आजार हे पाण्यामुळे होतात. वाघळापाडा, नवागाव या गावांचा आदर्श सर्व गावांनी घ्यावा असे सांगितले. उमराणचे सरपंच गोरजी गावित यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी बी. डी. देवरे यांनी आभार मानले. 

Web Title: pure one liter water in 50 paise