पुरुषोत्तम पाटील यांचे धुळ्यात निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

धुळे - ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील उपाख्य पुपा (वय 89) यांचे काल रात्री येथे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. 

धुळे - ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील उपाख्य पुपा (वय 89) यांचे काल रात्री येथे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. 

प्रा. पाटील हे मूळचे ढेकू (ता. अमळनेर) येथील रहिवासी होते. ते येथील एस.एस.व्ही.पी.एस. संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध होते. "तळातल्या सावल्या', "बलिदान' या कवितासंग्रहांसह तुकारामाची काठी हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. ते "कवितारती' मासिकाचे संपादक होते. तसेच "अनुट्यूब'चे साडेपाच वर्षे संपादक होते. त्यांच्या निधनाने खानदेशातील साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.

Web Title: Purushottam Patil died Dhule