मारवडला बॅंकांमधील रांगा कायम ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

गोवर्धन (ता. अमळनेर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद केल्या आहेत. या घटनेस आता सुमारे 65 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या निर्णयाने सर्वसामान्य ग्राहकांसह ग्रामीण भागातील जनतेचे कंबरडेच मोडले आहे. मारवड येथील बॅंकांमधील गर्दी अजूनही जैसे थे असून, ही गर्दी थांबेल काय? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. याकडे बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

मारवड येथे सेंट्रल बॅंक व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा आहे. मारवड गाव तालुक्‍यातील सर्वांत मोठे गाव मानले जाते. सुमारे दोन्ही बॅंकांमध्ये परिसरातील वीस गावांचा संपर्क येतो. सद्यःस्थितीत बॅंकेत पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ अडचणीत आले आहेत. संपूर्ण व्यवहारही खोळंबले आहेत. कापूस पिकाचे धनादेश एकेक महिन्यापासून बॅंकेत जमा करण्यात आलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रकमा जमा झालेल्या नाहीत. ग्राहकांची बॅंकांसमोर रांग रोज पहावयास मिळते. कडाक्‍याच्या थंडीतही सकाळीच ग्राहक बॅंकांच्या आवारात नंबर लावतात. जिल्हा बॅंकेत फक्‍त दोनच हजार रुपये मिळत आहेत. बॅंकेत रोज सुमारे पन्नास हजार रूपयांचेच वाटप होत आहे. परिसरातील दूध उत्पादक संस्था यांनाही मोठ्या अडचणी येत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांची शेतमजुरीचे पैसे व इतर व्यवहारही खोळंबले आहेत. सेंट्रल व जिल्हा बॅंकेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पुरेशा रकमेचा अभाव 
रिझर्व बॅंकेने ग्राहकांना पैसे काढण्यासंदर्भात मर्यादा वाढवून दिली. मात्र, बॅंकांमध्ये पुरेशा रक्‍कम उपलब्ध नसल्याने बॅंक प्रशासन ग्राहकांना पुरेसे पैसे देवू शकत नाही. याकडेही रिझर्व बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व बॅंकांना मुबलक रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

Web Title: Queues in banks