खरिपाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नाशिक - नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत यंदा खरिपाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 3 लाख हेक्‍टरने वाढले आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी विभागात रब्बीच्या 58.33 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा आतापर्यंत 28 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. नगरमध्ये ज्वारीच्या चार लाख 65 हजार 751 हेक्‍टरपैकी दोन लाख 12 हजार 835 म्हणजेच 45 टक्‍क्‍यांपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या. 

खरिपाच्या काढण्या पूर्ण झाल्यावर मोकळ्या झालेल्या क्षेत्रात शेतकरी गव्हासह हरभऱ्याची लागवड करतील. रब्बीचा हंगाम 15 सप्टेंबरपासून सुरू झाला असून ऑक्‍टोबरच्या सुरवातीपर्यंत ज्वारीची पेरणी शेतकरी करतात. ज्वारीची काढणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करडई, सूर्यफुलाची लागवड होते आणि या पिकांची काढणी 15 जानेवारीपर्यंत होते. ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये गव्हासह हरभऱ्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो. जिल्हानिहाय रब्बीचे सर्वसाधारण आणि प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र हेक्‍टरमध्ये असे ः नाशिक- 1 लाख 20 हजार 729- 16 हजार 941, धुळे- 81 हजार 868- 15 हजार 921, नंदूरबार- 71 हजार 486- 3 हजार 534, जळगाव- 1 लाख 52 हजार 656- 13 हजार 944, नगर- 6 लाख 45 हजार 103- 2 लाख 49 हजार 438. 

रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी 
जिल्ह्याचे नाव गेल्यावर्षी यंदा 
नाशिक 13.90 14 
धुळे 31.62 19 
नंदूरबार 18.95 05 
जळगाव 39.33 09 
नगर 75.01 39 

पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी 
ज्वारी - 42 
गहू - 10 
मका - 18 
हरभरा - 21 

Web Title: Rabi sowing area increased the kharif