चाळीसगाव तालुक्यात 'रेबीज' लस उपलब्ध 

दीपक कच्छवा
मंगळवार, 8 मे 2018

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रेबीजचा पुरेसा साठा आता उपलब्ध झाला आहे.त्यामुळे रेबीजचा तुटवडा निर्माण होणार नाही.
- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात रेबीजच्या लसीचा तुटवड्यासंदर्भात 'सकाळ' मध्ये वृत्त झळकल्यानंतर आरोग्य विभागाने ही लस उपलब्ध करून दिली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत तत्परता दाखवली असुन , रेबीज लसीमुळे रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे.

मेहुणबारे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.  अशी परिस्थितीत तालुक्‍यातील इतरही अनेक गावामध्ये आहे.तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत होती.या संदर्भात 'सकाळ' ने 4 एप्रिल च्या अंकातील 'टुडे' पान एकवर सविस्तरपणे अडीच वर्षातील कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्याची वस्तुनिष्ठ  अकडेवारी मांडुन 'मेहुणबारे परिसरात कुत्र्यांचा अडीच वर्षांत दिड हजार जणांना चावा' या 'मथळ्याखाली' सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.त्याची दखल घेत रविवारी   (6 एप्रिल) जळगावला  आरोग्य विभागात रेबीजच्या लसीचा साठा प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.

तालुक्यातही लस उपलब्ध 
चाळीसगाव तालुक्यातील दहाही प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज शिल्लक नव्हती. कुत्रा चावल्यानंतर रूग्णालयात रेबीजची लस मिळत नसल्याने दहीवद, लोंढे, खेडगाव, मेहुणबारे येथे रेबीज मिळत नसल्याने रूग्णांना  खाजगीत लसीचे पैसे मोजावे लागत होते.परंतु तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता रेबीजच्या लसी उपलब्ध झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.'सकाळ' च्या वृत्तानंतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ देवराम लांडे यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रेबीजचा पुरेसा साठा आता उपलब्ध झाला आहे.त्यामुळे रेबीजचा तुटवडा निर्माण होणार नाही.
- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव 

Web Title: Rabies vaccine available in Chalisgaon