भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांचा राडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांचा राडा 

जळगाव, ता. 3 ः महापालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वसंतस्मृती या कार्यालयात दुपारी सुरू झाल्या. त्याचवेळी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून कार्यालयाबाहेर उभे असलेली माजी नगरसेवक कैलास सोनवणे व पंकज सोनवणे यांच्यात जोरदार हाणामारी झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे भाजप कार्यालयाबाहेर धावपळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मनपा निवडणुकीसाठी आज भाजप कार्यालयात मुलाखती सुरू झाल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे समर्थकांनी गर्दी होती. दुपारी पावणेदोनला भाजप कार्यालयाच्या समोरील मोरया रेस्टॉरंट, महाराष्ट्र कृषी केंद्राच्या पायऱ्यांवर माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह नगरसेवक आश्विन सोनवणे, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, किरण बेंडाळे, आबा बाविस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी बसले होते. यावेळी पंकज सोनवणे याने पूर्ववैमनस्यातून कैलास सोनवणे यांना उद्देशून शिवीगाळ केली. यावेळी पंकज तसेच कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

परस्पर विरोधी गुन्हे दाखल 
हाणामारीसंदर्भात माजी नगरसेवक किशोर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की भाजप कार्यालयातील मुलाखतींसाठी आले असताना कार्यालयाबाहेरील किशोर राठोड यांच्या टपरीवर कैलास नारायण सोनवणे, धुडकू सपकाळे, सचिन सीताराम माळी, दीपक शरद बुनकर यांच्यासह इतर कार्यकर्ते बसलेले होते. त्यावेळी पंकज अंबादास सोनवणे (रा. रिधुरवाडा, शनिपेठ) हा तेथे आला व शिवीगाळ करीत त्याने काचेचा ग्लास फेकून मारला. या तक्रारीवरून पंकज सोनवणे याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला; तर पंकज सोनवणे याने दिलेल्या तक्रारीवरून कैलास नारायण सोनवणे, संजय मुरलीधर साळुंखे आणि संजय चौधरी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. 

माजी नगरसेवक जखमी 
यात जवळ असलेल्या कोल्ड्रिंक्‍स गाड्यांवरील काचेचे ग्लास एकमेकांना मारण्यात आले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हाणामारीदरम्यान भांडण सोडविण्यासाठी गेलेले माजी नगरसेवक किशोर चौधरी यांच्या हाताला काचेच्या ग्लास लागण्याने त्यांना दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

Web Title: rada