राहात्यात पडला साडेतीन इंच पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

राहाता - शहर व परिसरात काल (सोमवारी) सायंकाळी तब्बल साडेतीन इंच पाऊस झाला. गेल्या चार-पाच दिवसांत शहरात 269 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शेतात सर्वत्र पाणी साठले असून, छोटे ओढे-नाले वाहत आहेत. वाफसा होताच शेतकरी खरिपाच्या पेरण्या सुरू करतील.

येथे पावसाचे वार्षिक प्रमाण 500 ते 550 मिलिमीटर आहे. यंदा मॉन्सून येण्यापूर्वीच, अवघ्या पाच-सात दिवसांत पावसाने निम्मी सरासरी पूर्ण केली. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेती अवलंबून असलेल्या दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही काल पावसाचे आगमन झाले. तेथे 55 मिलिमीटर पाऊस झाला. धरणात नवीन पाण्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. तालुक्‍यात सर्वत्र सारखा पाऊस झालेला नाही. राहाता व परिसरातील दोन-तीन किलोमीटर अंतरात जोराचा पाऊस झाला. राहात्यात काल 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिर्डीत मात्र, काल 20 मिलिमीटरच पाऊस झाला. रांजणगाव येथे 22 व चितळी येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: rahata news 3.5" rain in rahata