धुळ्यात मोदींपेक्षा गांधींची सभा 'पॉवरफुल्ल' करायची : चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्‌घाटनासाठी धुळ्यात मालेगाव रोडवरील गो- शाळेच्या खुल्या जागेत 16 फेब्रुवारीला सभा झाली होती. यापाठोपाठ खासदार राहुल गांधी यांची एक मार्चला धुळ्यात सभा होणार आहे. तिच्या नियोजनासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज (गुरुवारी) दुपारी दोननंतर येथे दाखल झाले.

धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेपेक्षा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा "पॉवरफुल्ल' झाली पाहिजे, असे सांगत या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभेच्या अधिकाधिक उपस्थितीबाबत योग्य ते नियोजन करावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्‌घाटनासाठी धुळ्यात मालेगाव रोडवरील गो- शाळेच्या खुल्या जागेत 16 फेब्रुवारीला सभा झाली होती. यापाठोपाठ खासदार राहुल गांधी यांची एक मार्चला धुळ्यात सभा होणार आहे. तिच्या नियोजनासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज (गुरुवारी) दुपारी दोननंतर येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या धुळे मतदारसंघ क्षेत्रातील धुळे, नाशिक, तसेच जळगाव, नंदुरबार येथील कॉंग्रेसचे सर्व जिल्हा व शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संपर्क कार्यालयात बैठक सुरू आहे.

माजीमंत्री तथा इच्छुक उमेदवार माजीमंत्री रोहिदास पाटील, डॉ. तुषार शेवाळे, माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, ऍड. ललिता पाटील, आमदार कुणाल पाटील यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी श्री. चव्हाण व स्थानिक नेत्यांनी माजीमंत्री पाटील यांच्या एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे मैदान, पंतप्रधान मोदी यांच्या धुळ्यात झालेल्या सभास्थळाची पाहणी केली. श्री. चव्हाण हे जिल्हा- तालुकानिहाय प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सेलच्या अध्यक्षांशी संवाद साधत खासदार गांधी यांच्या सभेचे नियोजन करीत आहेत.

Web Title: Rahul Gandhi rally bigger than Narendra Modi in Dhule Says Ashok Chavan