जळगाव - दहीवद येथील हॉटेलवर छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मेहुणबारे (जळगाव) : दहीवद (ता.चाळीसगाव) येथील हाॅटेल कुणालमध्ये विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून 3 हजार 976 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

दहीवद (ता.चाळीसगाव) येथील कुणाल हॉटेलवर रात्री सातच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुक असलेले पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यानी छापा टाकला. तेथे असलेले  सचिन वाघ यांच्याकडे विना परवाना देशी विदेशी मद्य सुमारे 3 हजार 976 रुपयाचे आढळून आले. ती दारू जप्त करण्यात आली. या याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात कारवाईची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: raid on hotel in dahiwad jalgao