बनावट मद्य कारखान्यावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

चिंचवार (ता. धुळे) शिवारात बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेने साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Police raid
Police raidesakal

धुळे : चिंचवार (ता. धुळे) शिवारात बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेने साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेतमालकासह पाच संशयितांना पथकाने अटक केली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला.

चिंचवार शिवारातील वनजमिनीवर किरण देशमुख त्याच्या साथीदारासह अवैध मद्य बनविण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यावरून पथकाने बुधवारी (ता. १) सकाळी साडेदहाला चिंचवार शिवारातील रफिक महमूद पटेल याच्या शेतातील घरावर छापा टाकला. तेथे किरण देशमुख, रफिक पटेल (दोघे रा. चिंचवार ता. धुळे), रामसिंग ठाकरे (रा. शिवराय चौक, मालपूर, दोंडाईचा), हरीश पटेल (रा. धुळे) बनावट मद्य तयार करताना आढळून आले.

Police raid
कार्यवाही होणार असेल तर भुंकतो! भाजप नगरसेवक

असा मुद्देमाल जप्त

पथकाने दोन लाख रुपयांची टाटा सुमो (एमएच १९, एएक्स ०६२०), ७४ हजार ८८० रुपयांचे देशी मद्य, एक लाख १२ हजार ३२० रुपयांची व्हिस्की, तीन हजार ४८० रुपयांच्या देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ५० हजार रुपयांचे बूच पॅकिंग, मद्य मिक्सिंगचे तीन मशीन, ६५० रुपयांचे मद्याच्या बाटल्यांचे बूच, १५ हजार ५५० रुपयांचे चार मोबाइल, सहा हजार ३८० रुपयांचे मद्य बनविण्यासाठी लागणारे इतर साहित्य, असा एकूण चार लाख ६३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय मासूम पटेल (रा. चिंचवार, ता. धुळे) व त्याच्या साथीदारांनी हा मुद्देमाल ठेवल्याचे संशयितांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी संजय पटेलला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याने हे मद्य गुलाब शिंदे (रा. कावठी) व गुलाब पाटील नावाचा मित्र (रा. उभंड ता. साक्री) याचे असल्याचे सांगितले. मद्य बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिनेश (रा. शिरपूर) नावाच्या व्यक्तीने पुरविल्याचेही किरण देशमुखने सांगितले. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश सोनार, योगेश राऊत, धनंजय मोरे, संजय पाटील, संदीप सरग, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांनी ही कारवाई केली.

Police raid
संरक्षण द्यायला जमत नसेल तर, प्रत्येकाला बंदूका द्या : संदीप देशपांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com