यूटीएस अॅपच्या माध्यमातून काढता येणार रेल्वेचे तिकिट

Rail ticket booking can be done through the UTS app
Rail ticket booking can be done through the UTS app

मनमाड : देशभरात कुठेही रेल्वेने प्रवास करताना सर्वसाधारण तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभे राहून धक्के खाण्याची गरज नसून रेल्वेने तयार केलेल्या विशेष मोबाईल यूटीएस अॅपद्वारे सर्वसाधारण तिकिटे खरेदी करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. रेल्वेने ही सुविधा प्रवासी गाड्या किंवा सामान्य, मेल, एक्सप्रेस गाड्यांसाठी एक नोव्हेंबरपासून देशभर सुरू केली आहे.

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तिकीट कार्यालयाजवळ लांबच्या लांब रांगेत ताटकळत राहण्यापासून आता सुटका होणार आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने एक नवीन संकल्पना राबविली असून, त्यामुळे प्रवाशांना मोबाइलवरच थेट तिकीट काढता येणार आहे. यासाठी एक नवीन यूटीएस या नावाने अ‍ॅप बनविण्यात आले आहे. सुरवातीला काही स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, एक नोव्हेंबरपासून ही सुविधा देशातील सर्व रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिकीट काढताना अनेकदा वेळ होऊन जाते. स्थानकावरून गाडी सुटल्यामुळे प्रवास रद्द करावा लागतो. अन्यथा विनातिकीट प्रवास करावा लागतो. 

प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आसपास असले तरी त्याला रेल्वे तिकीट काउंटरच्या रांगेत उभे न रहाता एका क्लिकवर सामान्य तिकीट मिळू शकते. अथवा महिला, वृद्ध, अपंग व्यक्तींना रेल्वेत बसल्यानंतरही तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना तिकीट खिशात ठेवण्याची किंवा ते गहाळ झाल्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे. तर यामुळे तिकीट देण्यासाठी लागणाऱ्या कागदाची मोठ्या प्रमाणात बचतही होणार आहे.

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (क्रिस) तर्फे तयार अनारक्षित तिकिटींग अ‍ॅप (यूटीएस) च्या माध्यमातून तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. मोबाईलमध्ये हे आॅनलाईन युटीएस अ‍ॅप सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना डिजिटल तिकीट मिळणार आहे. रेल्वेने अनारक्षित तिकिट प्रणालीसाठी डिजिटल पेमेंटच्या दिशेने हे मोठे पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे प्रत्येक स्थानकावर असलेली तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. तर घाईमुळे तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.

आरक्षित तिकीट काउंटरवर लांबच लांब रांगा दिसत नसल्या. तरी त्याउलट सामान्य तिकीट खिडकीवर तिकिटांसाठी मोठ्या स्थानकावर मोठी रांग लागलेली दिसते. मोठ्या संख्येने प्रवासी रांगेत तिकीट घेऊ शकत नाहीत. अनेकदा मोठी रांग असल्यावर रांगेत उभे राहिले की गाडीची वेळ होऊन जाते. अशात प्रवास करणे महत्वाचे असते. अशावेळी अनेकदा पैसे असतानाही केवळ गाडी सुटून जाण्याच्या काळजीने तिकीट न काढता प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनारक्षित तिकिटांच्या ऑनलाइन विक्रीमुळे प्रवाशांचा फायदा होणार आहेत. मात्र, या सुविधेमुळे रेल्वेला देखील फायदा होणार आहे. या सुविधेचा फायदा ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनाच होणार आहे. तर ग्रामीण भागात आजही अनेकांकडे मोबाईल नाही. त्यांना या सुविधेचा फायदा घेता येणार नाही. यूटीएस अॅप सुविधेबाबत नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ऑफिशियल ट्विटरवर ट्विट करून माहिती देण्यात आली आहे 

असे करा अॅप डाउनलोड  

- मोबाइलमध्ये, आपल्याला Google प्लेट स्टोअर, विंडो स्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये जाऊन यूटीएस मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर प्रवाशाने अॅपमध्ये त्यांचा मोबाइल नंबर नोंदणी करावा लागेल. जवळचे रेल्वे स्टेशन, रेल्वे वर्ग, वर्ग, तिकीट प्रकार, प्रवाश्यांची संख्या आणि ज्या रस्त्यावर बहुतेक प्रवाशांना जायचे आहे त्या मार्गाचे नाव. नोंदणी पूर्ण झाल्यावर, रेल्वेच्या आर-वॉलेटवर शून्य बॅलन्सचे खाते उघडले जाईल. या आर-वॉलेटनंतर रेल्वेच्या यूटीएस काउंटरमधून रिचार्ज केले जाऊ शकते. वेब पोर्टल किंवा मोबाईल अॅपवरून रिचार्ज करणे देखील शक्य आहे

''या सर्वसाधारण तिकीट यूटीएस अॅपमुळे गर्दीच्या वेळस महिला, वृद्ध, जेष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, कॉलेज विद्यार्थी यांना अत्यंत मोठी सोय होणार आहे. तर विनातिकीट प्रवास कमी होऊन रेल्वेलाही आर्थिक फायदा होणा आहे. रेल्वे प्रशासनाने या अॅपची माहिती व मार्गदर्शन होईल, अशी व्यवस्था करावी. 

- नितीन पांडे, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय (झोनल) समिती सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com