नांदगावात आंबेडकर जयंतीसाठीच्या निघणाऱ्या शोभायात्रेचा मार्ग अखेर मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

एससी एस टी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ येथील रेल्वे मंडळ कार्यालयाकडे याबाबतचा पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय स्थानिक आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकऱ्यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. 

नांदगाव - शहरातील रेल्वे फाटकावरील कमी उंचीचा टाकण्यात आलेला लोखंडी बारचा अडथळा दूर करण्यात आल्याने आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेतील अडथळा दूर झाला नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या पुढाकारातून हा अडथळा दूर झाला. त्यामुळे आनंदनगर भागाकडून आंबेडकर जयंती निमित्ताने काढण्यात येणारी शोभायात्रा शहरात पूर्वीप्रमाणे प्रवेश करू शकणार आहे.

वर्षानुवर्षे रेल्वे विभाग, आनंदनगर भागातून यापूर्वी आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा निघत असते. मात्र गेल्या काही वर्षापासून रेल्वे फाटकाची उंची कमी करण्यात आल्याने सजविलेले रथ रेल्वे फाटकातून निघू शकत नव्हते. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने फाटकावर असलेल्या उंचीत घट करून हा आडवा लोखंडी बार एकूण उंचीच्या निम्य्यावर अडीच मीटर खाली आणल्याने वाहतुकीला अडथला आणला होता. हलक्या स्वरुपाची चारचाकी वाहने सोडण्यात येत असली तरी ट्रक बस अथवा टेम्पो मात्र जावू शकत नव्हते. ट्रकर वर सजविलेली रथ यात्रा देखील फाटकातून निघू शकत नव्हती. सध्या आंबेडकरी जयंती निमित्ताने जोरदार तयारी सुरु आहे. एससी एस टी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ येथील रेल्वे मंडळ कार्यालयाकडे याबाबतचा पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय स्थानिक आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकऱ्यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. 

रेल्वेच्या गेटची उंची कमी करण्यासाठी लावलेला आडवा लोखंडी बार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमिताने काढण्यात येणार असल्याने मिरवणुकीतला अडथळा दुर झाल्याचा आनंद आंबेडकर उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडे याची जबाबदारी येते. इतरत्र अधिक उंची असणारी रेल्वे गेट तालुक्यात आहेत. या पार्श्वभूमीवर नांदगाव शहराच्या रेल्वे गेटची कमी उंची हा वादाचा मुद्दा झाला आहे. एक दशकापूर्वी शहरातली वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गेटपासून एक किमी अंतरावर उड्डाण पूल बांधण्यात आला. तेव्हा त्या पुलावर अधिकृत पथकर ठेकेदारी सुरु झाली होती. पथकर वाचविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सर्वच वाहने रेल्वेगेटकडे वळू लागली. त्यानंतर रेल्वे गेटची उंची कमी करण्यात येऊन त्यातून ट्रक, अवजड वाहने इतकेच नव्हे तर प्रवासी बसेस सुध्दा जाऊ शकणार नाहीत. अशा उंचीवर लोखंडी बार बसविण्यात आला. शासकीय धोरणामुळे कालांतराने पथकर आकारणे बंद झाले. लोखंडी बार मात्र कमी उंचीवर विराजमान राहिला. आज निमितानिमिताने काही वर्षापूर्वी गुलदस्त्यात बंद झालेल्या चर्चांना तोंड फुटले आहे. 

कमी उंचीवर असलेल्या लोखंडी बारचा अडथळा या निमिताने दूर झाला असला तरी रेल्वेकडून फक्त आंबेडकर जयंतीसाठीच बार अधिक उंचीवर नेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. किती उंचीवर हा बार फिक्स करायला हवा. या संदर्भात रेल्वेची मार्गदर्शक प्रमाणे आहेत. उपलब्ध माहितीनुसार 4.67 मीटरवर बारची उंची असावी. मात्र सध्या ती त्यापेक्षा कमी आहे. उंची प्रमाणितापेक्षा कमी असण्यामागच्या कारणांची संशय कारणमीमांसा यानिमिताने सुरु झाली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Railwat track work done in nandagaon and the road is open for Ambedkar yatra