वरणगाव नजीक मालगाडीला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

भुसावळ - वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

भुसावळ विभागातून आज सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे कोळसा घेऊन जात असताना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता. गाडीच्या डब्याला आग लागल्याचा प्रकार आचेगाव येथील गेटमनच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव रेल्वेस्थानकावर याबाबत काळविले. स्टेशन मास्तर यांनी अप सेक्‍टरमध्ये दुसऱ्या लूप लाइनवर गाडी थांबवली. अग्निशामक दलाने तातडीने पाण्याचा मारा करताच आगीवर नियंत्रण मिळवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Fire Accident