अपंगांसाठी आता रेल्वेचेच ओळखपत्र

अपंगांसाठी आता रेल्वेचेच ओळखपत्र

मनमाड - रेल्वेने प्रवास करतांना तिकिटात सवलत मिळविण्यासाठी अपंगांना दाखल्याची झेरॉक्सप्रत द्यावी लागत होती. मात्र अनेकदा बोगस अपंग लाभ उठवीत असल्याने खरे अपंग लाभार्थी वंचित रहात होते. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन अपंग दाखल्याची पडताळणी करून रेल्वेचे अपंग सवलत ओळखपत्र देणार असून, आता अपंगांना तिकिटाच्या सवलतीसाठी झेरॉक्सप्रत देण्याची गरज लागणार नाही 

भारतीय रेल्वे गेल्या दीडशे वर्षापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या भाड्यात विविध सवलती देत आहे. यात स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ नागरिक, संसद, विधिमंडळ सदस्य, शारीरिक दृष्ट्या अपंग, अंध, कर्करोगी, विद्यार्थी, शासनमान्य पत्रकार, विविध शासकीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती, खेळाडू अशा सुमारे दोनशे प्रकारच्या सवलती प्रवास भाड्यात दिल्या जातात. यातील अपंगांना देखील तिकिटात सवलत असून, त्यासाठी त्यांना अपंग दाखल्याची झेरॉक्सप्रत द्यावी लागत होती. काहीवेळा प्रवासात त्यांना खरीप्रत देखील सोबत ठेवावी लागत होती त्यामुळे प्रत हरवण्याची शक्यता असते. तर अनेकदा ही सवलत मिळविण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे घेऊन लाभ उठविला जात होता. आता मात्र यासाठी रेल्वे अपंग ओळखपत्र देणार असून, या सुविधेमुळे ओळखपत्र प्राप्त अपंग व्यक्तींना तिकिटासाठी धक्के खात रांगेत उभे रहावे लागणार नाही. 

ओळखपत्रावर अंकित यूनिक आयडीच्या माध्यमातून त्यांना थेट इंटरनेटवरून तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. कुठल्याही कारणाने अपंग आलेल्या व्यक्तींना रेल्वेने प्रवास करताना कुणाचा आधार घेण्याची गरज पडू नये, त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, हा उद्देश समोर ठेवून रेल्वे प्रशासन अपंगांना ओळखपत्र वितरित करणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या अपंग व्यक्तींना सध्याच्या घटकेला तिकीट काढताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागणार आहे. यासाठी अपंगत्वाचा दाखला, आधारकार्ड, फोटो परिचयपत्र, जन्म, पत्तासंदर्भीप्रुफ, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला सर्व झेरॉक्सप्रत फोटो आदी लागणार आहे. हा अर्ज पोस्टाने अथवा समक्ष देता येणार आहे. सदर ओळखपत्र देशभर वापरता येणार आहे. २६ वर्ष वयोगटातील अपंगांना दर पाच वर्षांनी तर २६ ते ३४ वर्ष वयोगटातील यांना दर दहा वर्षांनी नूतनीकरण करावे लागणार असून ३५ वर्षापुढील व्यक्तींना तहहयात असणार आहे. त्याची अमंलबजावणी सुरु झाली आहे. मात्र यामुळे बोगस अपंग प्रमानपत्रांना आळा बसणार असून खऱ्या लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे. तर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सवलतीचे अपंग रेल्वे प्रवासी तिकीट देतांना सोयीचे होणार आहे. अपंग व्यक्तीच्या कागदपत्रांची पडताळणी विभागीय रेल्वे व्यस्थापकांमार्फत केली जाणार आहे

प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी भाडे सवलती संदर्भात माहिती देणारे फलक लावण्यात यावे, वाणिज्य विभागाने सवलतीसाठी स्वतंत्रकक्ष उघडाव
-नितीन पांडे, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय (झोनल ) समिति सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com