रेल्वेने फुकट किंवा बोगस तिकीटाने प्रवास करताय...सावधान!

madhya railway.jpg
madhya railway.jpg

नाशिक : रेल्वेत गर्दीचा गैरफायदा घेत बोगस रेल्वे तिकीट आणि फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने मोहीम हाती घेत ४६ जणांकडून २० लाखांची रेल्वे तिकिटे व रोकड ताब्यात घेतली आहे. दिवाळीच्या सुट्यांनंतर परतीच्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित गाड्यांशिवाय अतिरिक्त दिवाळी गाड्या भरभरून वाहत आहे. मध्य रेल्वेच्या सर्व पाचही मंडलात प्रशासनाने ई-तिकिटांच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस दलालांची शोधमोहीम सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी २६ ऑक्‍टोबरपासून ३ नोव्हेंबरपर्यंत राबविलेल्या अभियानात ४६ जणांना बोगस तिकिटांसह ताब्यात घेतले. या संशयितांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकांनी आतापर्यंत सुमारे ४९० तिकिटांसह १४ लाख एक हजार ६४८ रुपये, तर सहा लाख ५४ हजारांची ४७० रेल्वे तिकिटे असा सुमारे २० लाख ५५ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

"अधिकृत तिकीट खरेदी करा' तिकिटांचा काळाबाजार; ४६ दलालांना अटक 
मध्य रेल्वेने दिवाळीच्या सुट्यांच्या काळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे ४६ दलाल ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दल आणि आयआरसीटीसीतर्फे एकाचवेळी कारवाई करीत, संबंधित तिकिटे रद्द करण्यात आली. ई-तिकीट प्रणालीद्वारे दिवाळी आणि छटपूजादरम्यान रेल्वेला होणाऱ्या गर्दीत प्रवाशांची अडवणूक होऊ नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाइन ई-तिकीट प्रणालीत सहभागी दलालांकडून तिकीट न घेता अधिकृत तिकीट खरेदी करावे, असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांनी केले
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com