रिफंडच्या मर्यादेत रेल्वेकडून कपात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नाशिक - बाद नोटा वापरून महागडी रेल्वे तिकिटे काढून कालांतराने तीच तिकिटे रद्द करून सुटे पैसे मिळवत "व्हाइट' चलन मिळविण्याच्या प्रयत्नांना अटकाव घालण्यासाठी रेल्वेने फक्त रद्द तिकिटांचे पाच हजारांपर्यंत पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. पाच हजारांहून अधिक रकमेची रेल्वेची तिकिटे रद्द करून पैसे दिले जाणार नाहीत. 

रेल्वे मंडळाने याबाबत देशातील सर्व विभागांच्या रेल्वे व्यवस्थापकांना (वाणिज्य विभाग) आदेश दिला आहे. त्यानुसार जुन्या हजार व पाचशेच्या नोटा येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याची मुदत वाढवली. मात्र, त्याचवेळी 14 नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट काढून ते रद्द करणाऱ्या प्रवाशांना पाच हजारांहून अधिकची रेल्वे तिकिटे रद्द करू नयेत, असे सुधारित आदेशात म्हटले आहे. येत्या 24 पर्यंत हा आदेश असणार आहे. 

रेल्वे विभागात तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने सध्या रेल्वेकडे जुन्या बाद ठरविलेल्या नोटांचा भरणा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या नोटा वापरून काही मंडळी हजारो रुपयांची तिकिटे खरेदी करतात. त्यानंतर काही वेळानंतर किंवा एक-दोन दिवसांनंतर संबंधित तिकीट रद्द करून सुटे पैसे मिळवत असल्याचे सातत्याने घडल्याने त्यावर नियंत्रणासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रेल्वेप्रवास रद्द झाल्यानंतर तिकीट रद्द केले, तरी त्याची रक्कम पाच हजारांहून अधिक नसेल. 

Web Title: Railways to limit the reduction of refunds