भुसावळला जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

भुसावळ - शहरात मंगळवारी दुपारी साडेचारला ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी साचले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सव्वा सहाला पावसाच्या सरी आल्या. त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला आणि उकाड्याने भुसावळकर हैराण झाले.

आज दुपारपासूनच ढगांनी आकाशात गर्दी केली होती. त्यामुळे तापमान थोडे घसरले होते. अंजाळे (ता. यावल) घाटातील रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. तसेच स्थानक ते डीआरएम कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर आणि शहरातील काही भागात झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

न्हावीला हजेरी
न्हावी (ता. यावल) : न्हावी गावात आज दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस जास्त होता.

Web Title: rain in bhusawal