पहिल्याच पावसात बंधारे, नाले तुडुंब, पाणी फाउंडेशनचे यश

एल. बी. चौधरी
सोमवार, 4 जून 2018

सोनगीर (जि. धुळे) - पाणी फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बक्षिस मिळो अथवा न मिळो मात्र स्पर्धेंतर्गत खोदायचे झालेल्या कामामुळे श्रमदानाचे चीज झाले असून बंधारे, नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे पाणी फाऊंडेशन स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व कामाचे निष्ठेने श्रमदान व संयोजन करणाऱ्या युवकांनी अक्षरशः जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत त्यांनी हर्षाने एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. नदीकाठच्या मंदिराची पुजा अर्चा केली. जलपूजन करून यापुढेही दरवर्षी श्रमदान सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.

येथे व परिसरात काल रात्री सुमारे 35 मिमी पावसाची नोंद झाली. येथे गेल्या दोन वर्षांपासून हरीत सोनगीर मोहिमेअंतर्गत तलाव शेजारील टेकड्यांवर ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. यंदा गावाने वाॅटर कॅप स्पर्धेत भाग घेतला.

तेथेही हरीत सोनगीरचे सदस्यच पुढे सरसावले. पाणी फाऊंडेशन अंतर्गत श्रमदान व निधीतून पोकलँडच्या सहाय्याने लहान माती बंधारे, दगडी बांध तुडुंब भरले. तीन मोठ्या बंधाऱ्यात सुमारे तीन कोटी लिटर पाणी जमा झाले असून बंधारे लगतचे शेतकरी आनंदले आहेत. श्रमदानातून  गुळनदीला अन्य काही प्रवाह जोडल्याने गेल्या तीन वर्षांत यंदा प्रथमच पूर आला. गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अतुल देशमुख यांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदला. गेल्या दीड महिन्यांपासून बोअरवेल पाण्याअभावी बंद पडला होता. पाणी फाऊंडेशनने बोअरवेल भोवती चारी खोदली. आजपासून बोअरवेलला पुन्हा भरभरून पाणी आले. पाणी फाऊंडेशनमुळे एकाच पावसाने पाण्याबाबत बराच कायापालट झाला आहे.

श्रमदानाने भले मोठे कार्य सहज होते. तीव्र पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या सोनगीरकरांनी पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेले श्रमदान, केलेली आर्थिक मदत यामुळे गाव पाणीदार होण्याकडे वाटचाल केली आहे. 
- राहूल देशमुख, मुख्य प्रेरक, हरीत सोनगीर तथा पाणी फाऊंडेशन. 

पाणी फाऊंडेशन अंतर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानाने खोदलेल्या बंधारे तुडुंब भरले. त्याची पहाणी व जलपूजन करतांना कार्यकर्ते राहूल देशमुख, गोपाल सैंदाणे, किशोर पावनकर, पराग देशमुख, अर्जुन माळी, मोहन परदेशी, संदीप गुजर, अमोल बागूल, जितेंद्र बागूल, नंदू धनगर आदी.

Web Title: rain dam water full water foundation success