नाशिक जिल्ह्यासह खानदेशात गारपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

नाशिक/तळोदा/धुळे - गेल्या महिन्यापासून भाजून काढणाऱ्या तापमानानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यासह खानदेशात विविध ठिकाणी अचानक वादळ व गारांसह पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गारपीट, वीज आणि घर पडण्यामुळे नाशिक जिल्ह्यात १४ जण जखमी झाले. यामध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. 

खानदेशात नंदुरबार जिल्ह्यात तळोदा आणि शहादा तालुक्‍यांत काही वेळ गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने शेतातील बागायती पिकांच्या नुकसानीचा अंदाज आहे. याशिवाय धुळे जिल्ह्यातील नेर परिसरात व जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्‍यांतही बेमोसमी पावसाचा शिडकावा झाला. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, देवळा, नामपूर, सटाणा भागातील पिकांवर गारांचे थर साचले होते. दरम्यान, येत्या ६ तासांत जिल्ह्यात वारा, गारांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तळोदा शहरात आजच्या बेमोसमी पावसामुळे यात्रोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. अचानक झालेल्या या पावसाने साऱ्यांचीच धावपळ उडाली. पावसाला सुरवात झाल्यानंतर पंधरा मिनिटे पाच ते आठ सेंटिमीटर आकाराच्या पावसाबरोबर गाराही पडल्या. पावसाचे पाणी काही गल्ल्यांमध्ये सायंकाळपर्यंत साचून होते. शहरात ग्रामदेवता कालिकामातेच्या यात्रोत्सवास २८ एप्रिलपासून सुरवात झाली आहे. 

पावसामुळे नाशिक जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष व बागायती पिकांच्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. टपोऱ्या गारा आणि सोबत जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोपडून काढले. देवळा तालुक्‍यात वीज पडून एक जण आणि घर पडल्याने सहा जण जखमी झाले असून, ४ शेळ्यांचा मृत्यू झाला. झिरे पिंपळे (ता. देवळा) येथे एकनाथ यशवंत सोनवणे (वय २७) हे वीज पडून जखमी झाले, तर यशवंत राम सोनवणे यांच्या ४ शेळ्यांचा मृत्यू झाला. याच गावात हेमंत आहेर यांचे घर पडून कुटुंबातील चौघे जखमी झाले. याशिवाय देवळा तालुक्‍यातच माधुरी पवार (वय २५) व सीमा जाधव (वय ३५) या महिलाही जखमी झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

Web Title: Rain with hail in nashik