Vidhan Sabha 2019 : पावसाची उघडीप अन् आदिवासींच्या रांगा..आतापर्यंत २७.५६ % मतदान

ghoti election.jpg
ghoti election.jpg

नाशिक : लोकशाही उत्सव साजरा होताना पाऊस खोळंबा करेल काय? याची धाकधूक उमेदवारांमध्ये होती. पण पावसाने उघडीप दिली आणि आदिवासींनी मतदानासाठी रांगा लावल्या. 

बारानंतर काही केंद्रांवर पाड्याचे बूथ मोकळे

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत रासेगाव ते करंजाली मार्गावर जवळपास 50 टक्के मतदान झाले. सकाळी कामावर जाण्यापूर्वी कष्टकऱ्यांनी मतदान केल्याने रांगा पाहायला मिळाल्या. मग गावातील रहिवाश्यांनी घरकाम आटोपून मतदान करणे पसंत केल्याने रांगा कायम राहिल्या. बारा नंतर काही केंद्रांवर पाड्याचे बूथ मोकळे होते, तर काही केंद्रांवर गावातील मतदार बूथवर मतदार पाहायला मिळाले नाहीत.

उन्हाचा तडाखा
दुपारी ढगाळ हवामान निवळले आणि कडक उन्हाचा तडाखा बसू लागला. धग लक्षात घेऊन पावसा अगोदर मतदान उरकण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करू लागले होते.

गुजरातचे होमगार्ड
उमराळे ते करंजाली या भागात बंदोबस्त साठी गुजरात होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 2 बूथ च्या केंद्रावर 1 पोलीस आणि 1 होमगार्ड होता. आपले होमगार्ड कुठं आहेत म्हटल्यावर भरारी पथकातील अधिकाऱ्याने काही बोलण्याची सोय राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली.

नाशिकमध्ये दुपारी एक पर्यंत 27.56 % मतदान

पावसामुळे मतदानाचा खोळंबा होईल अशी भीती व्यक्त होत असताना अचानक मोकळे आकाश झाल्याने सर्व मतदार घराबाहेर पडले आहेत. ज्यामुळे मतदानाचा टक्का देखील वाढण्य़ाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाशिकमध्ये दुपारी एक पर्यंत 27.56 % मतदान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com