मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना इगतपुरी न्यायालयात जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

इगतपुरी - परप्रांतियाची हॉटेल तोडफोड प्रकरणी दाखल खटल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आज इगतपुरी न्यायालयाने जामीन मंजूर केला. या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावले होते. सुनावणी वेळी मुंबई व नाशिक जिल्ह्यातील राज समर्थकांनी एकच गर्दी केले होती. सुनावणी वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. 2008 मध्ये रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळाले असल्याने अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले होते. त्यात राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे सैनिकांनी हल्ला करीत तोडफोड केली होती.

याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी न्या. के. आय. खान यांच्या न्यायालयात सुरू आहे. यातील 6 संशयितांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली असून ठाकरे हे सुनावणीला हजर राहत नसल्याने खटला प्रलंबित होता. न्यायालयाने त्यांना हजर राहण्याची अंतिम समन्स बजावला. यामुळे ठाकरे आज उपस्थित राहिले.

Web Title: Raj Tahckeray Court Bell Sanction