राज ठाकरे यांची 17 ला गोल्फ क्‍लबवर सभा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा 17 फेब्रुवारीला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे.

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा 17 फेब्रुवारीला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे.

महापालिकेकडे पक्षाकडून याबाबत अधिकृत नोंद करण्यात आली आहे. जाहीर सभांसाठी शहरात गोल्फ क्‍लब मैदान सर्वांत मोठे मैदान आहे. सभेला गर्दी खेचण्यासाठी तेथे मोठे दिव्य पार पाडावे लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या मैदानावर प्रचंड सभा व्हायच्या. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा तेथे यापूर्वी झाल्या आहेत. यंदा 16 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका मांडतील, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 17 फेब्रुवारीला राज ठाकरे यांची सभा होईल. याच मैदानावरून राज यांनी गेल्या निवडणुकीत विरोधकांवर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली होती. त्यांच्या याच सभेमुळे शहराचे वातावरण मनसेमय झाले होते. यंदा राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार? ते कोणावर तुटून पडणार? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

Web Title: raj thackeray meeting on golf club