मोदींना अमितच्या लग्नाला बोलविणार नाही; कारण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मोदींपेक्षा सगळ्यात जास्त देश कोणीच खड्डयात घालू शकत नाही. अमितचं लग्न 27 जानेवारीला असून, साध्या पद्धतीने विवाह होणार आहे. फार मोठ्या प्रमाणावर आमंत्रण देणार नाही. बोलवायचं म्हणून आकडा काढला तो 6 लाखावर गेला. ठराविक लोकांनाच बोलावणार आहे.

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा 27 जानेवारीला विवाह असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देणार नसल्याचे कारण यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची मिश्किलपणे उत्तर दिली. या पत्रकार परिषदेवेळी अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहात का?  असा प्रश्न विचारला असता मोदींचा लग्नावर विश्वास आहे का अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे म्हणाले, की मोदींपेक्षा सगळ्यात जास्त देश कोणीच खड्डयात घालू शकत नाही. अमितचं लग्न 27 जानेवारीला असून, साध्या पद्धतीने विवाह होणार आहे. फार मोठ्या प्रमाणावर आमंत्रण देणार नाही. बोलवायचं म्हणून आकडा काढला तो 6 लाखावर गेला. ठराविक लोकांनाच बोलावणार आहे. सगळ्यांना बोलावणं मला अशक्य आहे. मोदींचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का?

Web Title: Raj Thackeray talked about Narendra Modi invitation on Amit Thackeray marriage