राजाभाऊ गोडसे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

देवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. गेल्या महिन्यापासून गोडसे यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

देवळाली कॅम्प - शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे (वय 59) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. गेल्या महिन्यापासून गोडसे यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्यावर उद्या (ता. 18) दारणा नदीकाठी अंत्यसंस्कार होतील. चुलते अंबादास गोडसे हे शिवसैनिक असल्याने राजकारणात शिवसेनेविषयीचे बाळकडू त्यांना मिळाले. संसरी गावचे शाखाप्रमुख ते खासदार असा त्यांचा जीवनप्रवास झाला. तरुणपणीच त्यांचे उमदे व भारदस्त नेतृत्व बघून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर 1984 ते 1996 या कालावधीत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. बुलंद आवाज व भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे जिल्ह्यातील राजकारणात एक वेगळाच ठसा राजाभाऊंनी उमटविला. लाखोंच्या सभेवेळी ते दमदार भाषणास सुरुवात करताच "जय भवानी-जय शिवाजी' अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून जात असे.

Web Title: Rajabhau Godase Death