मनमाड नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची राजेंद्र आहिरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मनमाड - मनमाड नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख व उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे  यांनी आज सूत्रे हाती घेतली. पालिकेत शिवसेना रिपाईची सत्ता असून, शिवसेनेने रिपाईला प्रभारी नगराध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार शिवसेनेने दिलेला शब्द आज पूर्ण करण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले आहिरे यांनी हाती सूत्रे घेताच त्यांच्या समर्थकांनी पालिके जवळ फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.

दोन वर्षा पूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना रिपाइंची युती होती या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मावती धात्रक या जनतेतून थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर पालिकेत सेनेला पूर्ण बहुमत ही मिळाले त्यानंतर उपनगराध्यक्षपद रिपाईला देण्याचा ठरले होते त्यानुसार रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले राजेंद्र आहिरे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती उपनगराध्यक्षपदाबरोबर प्रभारी नगराध्यक्षपदही देण्याचे शिवसेनेने शब्द दिला होता त्यानुसार आज उपनगराध्यक्ष असलेल्या राजेंद्र आहिरे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली सध्या  पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठी तारेवरची कसरत आहिरे यांना करावी लागणार आहे नाले, गटारी, आगीदर साफ करणार असून शहरातील रस्ते, मंजूर कामे मार्गी लावणार आहे शहरातील पूर्णाकृती पुतळ्यांसदर्भात पाठपुरावा करणार तसेच सुरळीत पाणी पुरवठा करणे, शहर स्वछतेची कामे करणार असल्याचे आहिरे यांनी पत्रकारांना सांगितले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, शहरप्रमुख मयूर बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसकचे गटनेते छोटू पाटील, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, कैलाश गवळी, लियाकत शेख, शहर उपप्रमुख जाफर मिर्झा यांच्यासह इतर नगरसेवक,शिवसेना रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजेंद्र आहिरे यांचा सर्व नगरसेवक व सेना रिपाईतर्फे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले

Web Title: Rajendra Ahire, President of Municipal Corporation in charge of Manmad Nagar Parishad