भारतीय सैन्य दलातील कार्यरत सैनिकांना शाळेत बोलवत रक्षा बंधनाचा कार्यक्रम

खंडू मोरे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खामखेडा(नाशिक) - शालेय विध्यार्थ्यांमध्ये सामाजिक सदभावना वाढीस लागावी.राष्ट्रासाठी समर्पण भावनेतून योगदान देणाऱ्या सैनिकांनप्रती संवेदनशिलता जागृत रहावी.व भारतिय सैनिकांच्या या ऋणातून उतराई होता यावे यासाठी देवळा जिजामाता विध्याल्याच्या वतीने देवळा तालुक्यातील भारतीय सैन्यदलात कार्यरत व सध्या सुट्टीवर असलेल्या सैनिकांना राख्या बांधून व या सैनिकांच्या युनिट मधील सीमेवर असलेल्या इतर सैनिकांना कृतज्ञतेपोटी रक्षाबंधनच्या विशेष उपक्रमातून राख्या पाठविण्यात आल्या.

भारतीय जवान भारतमातेसाठी प्रसंगी प्राणांची आहुती देऊन राष्ट्रासाठी बलिदान देत देशवासियांचे संरक्षण करतात. अशा सैनिकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी व सैनिकांविषयी संवेदना जागृत रहाण्यासाठी देवळा येथील जिजामाता विध्यालयाच्या मुख्याध्यापिका उषा बच्छाव यांच्या कल्पनेतून “सैनिकांसाठी  रक्षाबंधन”(शनिवार २५)हा उपक्रम शाळा स्तरावर घेण्यात आला.

 विध्यालयाच्या विध्यार्थिनीनी आपल्या हातांनी लोकरीचे धागे,फोमशिट,रंगिबेरंगी कागद,टिकल्या लोकरीच्या धागे यांच्या सहाय्याने पर्यावरण पुरक राख्या बनविल्या होत्या.सातशे  विध्यार्थिनीनि तयार केलेल्या या राख्या देवळा तालुक्यातील व सध्या सुट्टीवर आलेल्या सैनिकांना शाळेत बोलवत या सैनिकांना विध्यार्थिनीनी राख्या बांधत व शाळेच्या वतीने या सैनिकांच्या माध्यमातुन सीमेवर पाठविण्यात आल्या.

 रक्षाबंधन विशेष उपक्रमातुन पहिल्यांदा आम्हाला कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित रहाता आल्याचे सैनिक राहुल पाटील यांनी सांगितले.सुरेश चहाण,राहूल आहेर,हेमंत चव्हाण,हेमंत शिरसाठ, हर्षल देवरे,किरण देवरे,नितीन शेळके,योगेश खैरणार,संदिप पाटील,राकेश शिंदे,मनोहर पगार,किसन आहेर,धनंजय पाटील,राहूल आहेर,विकी जाधव आदि सैनिकांना या कार्यक्रमात राख्या बांधण्यात आल्या.व विद्यार्थ्यानी स्वहस्ते बनवलेल्या राख्या हया सीमेवरील जवानांसाठी या सैनिकांजवळ सुपूर्द करण्यात आल्या.

 जनार्दन बत्तीसे यांनी प्रास्ताविक केले.सुनिल पवार ,सुमेरसिंग ठोके यांनी मनोगत व्यक्त केले.अनिल पाटील यांनी सुत्रसंचालन केले.एम ए आहेर यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौतिक खोंडे,पंकज जाधव,मनिषा आहेर,भारत पवार,भाऊसाहेब सूर्यवंशी,देविदास निकम,सिताराम आहेर,संजय आहेर,देवाजी भदाणे,शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले.

Web Title: rakshaband in school with indian army soldiers