मुकबधिर शाळेतील बहिणींसोबत विणला मायेचा धागा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

येवला : आजचा तरुणांविषयी कोणी काहीही म्हणो पण पण तो संवेदनशील आहे, याची साक्ष दैवत गृपच्या शंभराहून अधिक तरुणांनी दिली...या मुलांनी राखी पौर्णिमेचे निमित्त साधून अंगणगाव येथील मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयातील मुकबधिर मुलींकडून राख्या बांधून घेऊन एक अतूट असा मायेचा धागा विणला. आज सकाळी दहा वाजता एक-एक करून ही तरुणाई शाळेच्या प्रांगणात जमा होऊ लागली आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या या युवा शक्तीने सर्वांचेच कुतूहल वाढवित नेले.

चौकशी केली असता, "आमचे आजून काही कार्यकर्ते येत आहेत, सर्वजण जमले की सांगतो" असे सांगून या युवा नेत्यांनी सर्वांचीच उत्सुकता वाढवित नेली. काही वेळातच विविध क्षेत्रातील शेकडो तरुण जमले आणि त्यांनी आपल्याजवळील राख्या दाखवून मुक बधिर बहिणींसोबत नात्यांची वीण घट्ट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. क्षणार्धात शाळेच्या मैदानावर हा ह्रदय सोहळा सुरु झाला. शाळेतील मुक बधिर मुलींनीही यावेळी मुलांना मोठ्या प्रेमाने राख्या बांधून या भाऊरायांना ओवाळून बहिण भावाच्या नात्याला उजाळणी दिली. या युवकांनी निवासी कर्ण-बधिर मुलांना मिष्ठान्न भोजन दिले व रोजच्या भोजनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर करून सामाजिक बांधिलकी जपली व सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. शेखर शिंदे, निलेश भुजबळ, चेतन पाटोळे, देविदास गायकवाड, सागर घुगे, योगेश पाटोळे, संदीप चव्हाण, मनोज क्षञीय, निलेश पाटोळे, निलेश शेंञे, अमोल शिंदे, विकी वैद्य, दीनानाथ नागपुरे, सोमनाथ घुगे, राहुल वाकचौरे, भाऊ वाघमारे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: Rakshabandhan celebrate with handicapped students

टॅग्स