कष्टकरी भगिनींसोबत प्रेमाचे अतूट रक्षाबंधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

येवला : कष्टकरी भगिनींच्या वस्तीवरील भगिनींसाठी रोजप्रमाणेच आजचा दिवस उजाडला...त्यांच्यासाठी रक्षाबंधन तसा विशेष नाहीच..पण येथील जनकल्याण सेवा समितीच्या जेष्ठ सदस्यांनी खेड्यावरील कष्टकरी भगिनींसोबत प्रेमाचे अतूट रक्षाबंधन साजरे करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

आपले काम नित्याचेच किंवा अनेक कारणांमुळे रक्षाबंधनासाठी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाऊ शकत नाही. काहींना आर्थिक अडचणी असतात, काहींना घरगुती समस्यांमुळे तर काहींना रोजगार बुडेल या कारणाने राखी बांधण्याकरता जाता येत नाही. यामुळे येथील जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे गेल्या 17 वर्षांपासून खेड्यापाड्यांवर जाऊन कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेऊन त्यांना भावाची भेट म्हणून साडीचोळी भेट देतात. 

आज समितीचे सर्व सदस्य विठ्ठलाचे कोटमगाव येथील वस्तीवर गेले व तेथे रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. भगिनींना साडीचोळी समितीतर्फे भेट देण्यात आली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, श्यामसुंदर काबरा, बाळासाहेब पाटोदकर, मुकेश लचके, दिगंबर कुलकर्णी, गणेश शिंदे, सुरजमल काबरा, शशिकांत मालपुरे, विजय पोंदे, सदस्य नंदलाल भांबारे, किशोर कुमावत, किरण शिंदे, प्रभाकर आहिरे, सुधाकर भांबारे, राजू ताठे, विकी शीकलकरी, दत्ता आहेर, अमोल निकम, तसेच सरपंच सोनाली महेश कोटमे, अनिल माळी, प्रकाश ढमाले, नवनाथ ढमाले, रामदास भुजाडे, दिलीप माळी, मनोहर बर्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Rakshabandhara the love bond with the hard working sisters