राळेगण सिद्धीत हमरा गाव हमार राजची हाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

राळेगण सिद्धी - पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुकास्तरिय ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी ग्रामसभेच्या आग्रहाखातर सहा दिवसापासून सुरू असलेले उपोषण उपसरपंच लाभेष औटी, ज्ञानेश्वर हावळे, नंदकुमार मापारी, रमेश औटी, तुकाराम क्षिरसागर यांनी सोडले.

उद्या पासून राळेगण सिद्धीत हमरा गाव हमार राज या प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना गाव बंदी करून गावातील व काही तालुक्यातील कार्यकर्ते आत्मदहन करणार असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उद्या संपूर्ण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. तालुका बंद बरोबर रस्तेही बंद करण्यात येणार आहेत.

या वेळी उपसभापती दीपक पवार, श्रीकांत पठारे, राहुल शिंदे, निलेश लंके, मणी सरपंच जयशिंग मापारी, संजय वाघमारे, शंकर नगरे, गुलाब डेरे, विलास पोटे, सबाजी गायकवाड, युवराज पठारे, संतोष खोड दे, शिवाजी व्यवहारे, रमेश औटी सुभाष पठारे, आदी मान्यवर  उपस्थिती होते.

Web Title: ralegansiddhi hamara gaon hamara raj