शासकीय योजनेच्या लाभासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मालेगाव - शहरातील मोतीबाग नाका, कलेक्‍टरपट्टा, अयोध्यानगर, नवीन वसाहत आदी भागातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबीयांना पिवळी शिधापत्रिका मिळावी, विधवा, परितक्‍त्या, निराधार महिला, अंध, अपंग व मूकबधिरांना योजनेत समाविष्ट करून प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे, या मागणीसाठी आदित्य फ्रेंड सर्कलतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आदित्य फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष विश्‍वनाथ बहिरम व जगन ढिलोर यांच्या नेतृत्वाखाली मोतीबाग नाका भागातून दुपारी चारला मोर्चा निघाला. जुना आग्रा रोड, मोसम चौक, कॅम्प रोड या मार्गावरून मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. जगन ढिलोर यांनी नागरिकांच्या समस्या कथन केल्या. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परिसरातील ६५ वर्षांवरील वृद्ध, विधवा, परितक्‍त्या व निराधार महिला, अंध, अपंग व मूकबधिरांना शासकीय योजनांचा लाभ देऊन प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे, अनाथ मुला-मुलींना शासकीय योजनेत सामावून घ्यावे, प्रभाग ११ मधील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी याच भागात ‘सेतू’ची शाखा सुरू करावी, गरजूंना पिवळ्या शिधापत्रिका द्याव्यात, अनेक नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातून वस्तू मिळत नसल्याने त्यामुळे शिधापत्रिका तातडीने द्याव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मोर्चात बापू निकम, पिंटू चौधरी, अरविंद धिवरे, पिंटू परदेशी, अशोक धिवरे, गणेश गाडेकर, बापू जगताप, आशाबाई निकम, मीनाबाई पवार, मीना सोनवणे, सरलाबाई पाटील, कलाबाई अहिरे, दीक्षा देवकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Rally on Collector's office for the benefit of a government plan