दोन आरोपींना गुरुवारपर्यंत कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

साक्री - खवे (ता. मंगळवेढा) येथील नाथपंथी डवरी समाजाच्या पाच भिक्षुकांच्या राईनपाडा (ता. साक्री) येथे झालेल्या क्रूर हत्याकांड प्रकरणी ताब्यातील 25 संशयित आरोपींना काल  येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, jरविवारी (ता. 8) कळमबारी जंगलातून ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी दशरथ पिंपळसे व चौपाळे येथून ताब्यात घेतलेला गुलाब पाडवी यांना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या 25 आरोपींना धुळे कारागृहात, तर अन्य दोघांना साक्री पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. 

समाजमन सुन्न करणाऱ्या या अमानुष हत्यांकाडातील आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना तपास अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी काल येथील न्यायालयात हजर केले. सर्व 25 आरोपींकडून अद्याप ठोस माहिती मिळत नसल्याचे सांगत, कालच ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी घुमरे यांनी केली. सरकारी वकील ऍड. डी. आर. जयकर यांनीही युक्तिवादात ताब्यात असलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी व काल ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपींच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपींतर्फे ऍड. मनोज खैरनार, ऍड. मोहन साळुंके, ऍड. एम. झेड. देवरे, ऍड. अनिल वळवी यांनी युक्तिवाद करताना ताब्यातील आरोपींच्या चौकशीसाठी दोन वेळा पोलिस कोठडी देऊन पोलिसांना पुरेशी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. 

यावर न्या. आर. एस. वानखेडे यांनी संशयित राजू गवळी (रा. सावरपाडा, ता. साक्री), सुकलाल कांबडे, राजाराम राऊत, सुरज्या भवरे, काळू गावित, चुनीलाल माळीच (सर्व रा. राईनपाडा), गोटीराम चौधरी, किरण राऊत (दोघे करंझटी), गोट्या बिऱ्हाडे (रा. आमळी), गोपाल कुवर (रा. माळपाडा), सुक्राम कांबळे (रा. काकोडपाडा), गोविंदा देशमुख (रा. जामतलाव), प्रवीण राठोड, मिथुन राठोड (दोघे रा. सातरपाडा), बंडू साबळे (रा. जामूनपाडा), गुलाब गायकवाड (रा. खरटीपाडा), गजमल मालुसरे (रा. शिरसोली), शांताराम गायकवाड (रा. बांडीकुहेर), किशोर पवार, अजित गांगुर्डे, सिद्धार्थ गांगुर्डे, दिलीप गांगुर्डे (सर्व रा. सुतारे), मोतीलाल साबळे (रा. निळीगोटी) यांच्यासह मुख्य आरोपी महारू पवार (रा. जांभळीपाडा) व हिरालाल गवळी (रा. सावरपाडा) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवारीच ताब्यात घेतलेल्या दशरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

Web Title: Ranipada massacre Two accused in custody till Thursday