रहाणे, शॉसोबत रणजीत जळगावचा हा खेळाडू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

"रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघातून खेळणार असून याचा आनंदच आहे. अष्टपैलू म्हणून निवड असली तरी गोलंदाजीवर अधिक लक्ष असून, आपली कामगिरीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असेल.' 
- शशांक अत्तरदे, फिरकी गोलंदाज ​

जळगाव : फिरकी गोलंदाजीने चांगल्या फलंदाजाची त्रिफळा उडविणारा जळगावचा शशांक अत्तरदे आतापर्यंत जिल्हास्तरीय, क्‍लबकडून खेळताना पाहण्यास मिळत होता. परंतु, आता त्याची फिरकी रणजी क्रिकेट स्पर्धेत पाहण्यास मिळणार आहे. रणजीच्या मुंबई संघात शशांक अत्तरदेची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे रणजी स्पर्धेतून खेळणारा शशांक हा जळगावातील पहिला खेळाडू ठरला आहे. 
जळगावातील रहिवासी असलेला शशांक विनायक अत्तरदे हा शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आहे. सुरवातीला ला. ना. विद्यालयातून क्रिकेट खेळला. यानंतर जैन स्पोर्टस्‌ अकॅडमीकडून आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यासोबतच शशांक हा ओपनिंग बॅटस्‌मन म्हणून फलंदाजीला उतरत असतो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या आधारावर संघाला विजय देखील मिळवून दिले आहेत. 

Image may contain: 1 person, playing a sport, baseball and outdoor

विद्यापीठ संघाचे केले नेतृत्व 
आंतर शालेय, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर शशांकची निवड ही विद्यापीठ संघातून झाली होती. विद्यापीठा संघाचे प्रशिक्षक प्रा. डॉ. सचिन झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली शशांकने विद्यापीठ संघाकडून खेळताना संघाचे तिन स्पर्धांमध्ये कर्णधार पद देखील सांभाळले आहे. बाहेती महाविद्यालयात कॉमर्सचे शिक्षण घेत असताना ऑल इंडिया इंटरयुनिर्व्हसिटी (वेस्ट झोन) क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत कलकत्ता, सुरत, मुंबई, सागर, भोपाल, अहमदाबाद येथे सलग सहा वर्ष विद्यापीठ संघाकडून खेळला आहे. आपल्या नेतृत्वाखाली विद्यापीठ संघाला तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारता आली होती. 

क्‍लिक करा > खाकिने घेतले छत्रपतींच्या युद्धनीतीचे धडे 

सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान 
शशांक अत्तरदे सहा वर्षांपासून मुंबईत राहून क्‍लब क्रिकेट व कार्पोरेट क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला आहे. तसेच मे 2019 मध्ये मुंबई टी- 20 लिग स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर कर्नाटक येथे झालेल्या केएससीए टुर्नामेंटमध्ये मुंबईकडून खेळला आहे. या स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात दहा गडी बाद करून सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान मिळविला आहे. यात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही 30 षटकात 75 रन देत 5 गडी बाद केले आहेत. 

हेही वाचा > थरार...पाडत ठेवत रस्ता अडविला अन्‌ 

मुंबई संघात एकमेव जळगावचा 
शशांक हा जळगावमधून बाहेर गेलेला एकमेव खेळाडू आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेकरीता निवड झालेल्या मुंबई संघात त्याची निवड झाली आहे. जळगावसाठी हा प्रथमच बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या रणजी संघात निवड झालेले खेळाडू सर्व मुंबईचे असून शशांक हा एकमेव जळगावचा आहे. या संघात भारतीय संघातील अजिंक्‍य रहाणे, पृथ्वी शॉ यासारख्या महान खेळाडूंचा सहभाग आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranji cricket silection mumbai team shashank jalgaon spin bowler