वणी येथील वाड्यात कर्मवीर रावसाहेब थोरातांचे स्मारक होणार

दिगंबर पाटोळे 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) :  प्रतिकुल परीस्थितीत शिक्षण संस्था स्थापन करुन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कर्मवीर रावसाहेब थोरातांचे विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनुकरण करणे आवश्यक असून येथील कर्मवीर रावसाहेब थोरातांच्या वाड्यात कर्मवीरांना साजेसे स्मारक संस्था उभे करणार असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील यांनी केले. 

येथील केआरटी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती तथा समाज दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दत्तात्रय पाटील होते. संस्थेच्या वणी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी चार एकर जागा घेतली असून लवकरच तेथे इमारत बांधली जाणार असल्याचेेही श्री.  पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अर्थशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. एस. जी. श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरु मानावे शिवरायांच्या गुणांचा अनुकरण करावे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. बच्छाव यांनी संस्थेच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला . यावेळी उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके व स्वाती बोरसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना जमदाडे, पंचायत समितीचे उपसभापती उत्तमराव जाधव ,गंगाधर निखाडे, अॅड विलास निरगूडे, संजय उंबरे, सुनील थोरात, संपत कडलग, अशोक पवार, राकेश थोरात, गोटीराम गोरे, प्रशांत कड, मुक्ताताई ठाकरे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एन बी पाटील व आभार श्रीमती दीपाली दुबे यांनी आभार मानले
 
Web Title: raosaheb thorat smarak in vani