काम देतो असे सांगत दिव्यांगाला नेले लॉजवर..अन्..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

पीडित युवक दिव्यांग असून कामाच्या शोधात शहरात आला होता. पिनॅकल मॉल येथे तो थांबलेला असताना एका युवकाकडे त्याने कामाची विचारणा केली होती. त्यानंतर तो सीबीएसच्या दिशेने चालत जाताना पेट्रोलपंपासमोर एक संशयित युवक त्यास भेटला. त्याने पीडित युवकाला काम देतो, असे इशाऱ्याने सांगून सीबीएस बसस्थानकातील शौचालयाजवळ नेले.

नाशिक : शहरात कामाच्या शोधात आलेल्या सिडकोतील दिव्यांग युवकास भद्रकालीतील लॉजवर नेऊन दोन संशयितांनी अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित युवक कसाबसा घरी परतल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केलेली नसून, ज्या लॉजवर हे कृत्य करण्यात आले, त्या लॉजचीही चौकशी करण्यात आलेली नाही. 

भद्रकालीतील प्रकार; दोन संशयित फरारी 
24 वर्षीय पीडित युवक दिव्यांग असून, सोमवारी (ता. 25) सायंकाळी कामाच्या शोधात शहरात आला होता. पिनॅकल मॉल येथे तो थांबलेला असताना एका युवकाकडे त्याने कामाची विचारणा केली होती. त्यानंतर तो सीबीएसच्या दिशेने चालत जाताना पेट्रोलपंपासमोर एक संशयित युवक त्यास भेटला. त्याने पीडित युवकाला काम देतो, असे इशाऱ्याने सांगून सीबीएस बसस्थानकातील शौचालयाजवळ नेले. त्याठिकाणी ऍक्‍टिवावर असलेल्या संशयिताने त्यास बरोबर घेऊन तिघे जण भद्रकालीतील तलावाडीत नेले. जुने टॅक्‍सी स्टॅण्डजवळ असलेल्या अल्बाशी लॉजवर दोन संशयितांनी पीडित युवकाला नेले. त्यानंतर त्यांनी त्यास एका रूममध्ये नेले आणि दोघांनी दिव्यांग युवकावर अतिप्रसंग करीत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर त्यास संशयितांनी सीबीएस परिसरात सोडून पोबारा केला. 

हेही वाचा >प्रेम केलय...आंतरजातीय असलो म्हणून ठार मारणार का?

होत असलेल्या त्रासाबद्दल भावाने केली विचारणा

रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित दिव्यांग युवक कसाबसा सिडकोतील घरी पोचला. त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल त्याच्या भावाने त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने घडलेला प्रसंग इशाऱ्याने सांगितले. पीडितास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यास भावाने उपचारासाठी मध्यरात्री जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार याप्रकरणी जिल्हा पोलिस चौकीत नोंद करण्यात आल्यानंतर त्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना कळविण्यात आली. घटना भद्रकालीच्या हद्दीत घडलेली असल्याने मंगळवारी (ता. 26) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > PHOTO : काय भानगड आहे ही..लग्नाचे आमंत्रण आहे की शासननिर्णय? बघा तरी...

तलावाडी गुन्हेगारांचा अड्‌डा
गेल्या रविवारी तलावाडीतील पोलिस चौकीपासून काही अंतरावरील मटका जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. ज्या लॉजवर ही घटना घडली आहे त्याठिकाणी अनेक अवैध धंदे चालतात, अशी चर्चा आहे. परंतु पोलिसांकडून याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. दरम्यान, या घटनेत अद्यापही पोलिसांच्या हाती संशयित लागलेले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of Disabled young boy at Nashik Crime Marathi News