पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणीवर दोघांकडून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

फैजपूर (जि. जळगाव) - भुसावळ येथील सोळा वर्षीय तरुणीवर दोन अनोळखी तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना अकलूद शिवारात पिळोदा रस्त्यालगत काल सायंकाळी घडली. ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती, अशी माहिती समोर आली असून, अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित प्रेमीयुगुलाची चौकशी केली.

भुसावळ शहरातील रहिवासी अल्पवयीन तरुणी प्रियकरासोबत काल संध्याकाळी फिरण्यास गेली. ते अकलूद शिवारात पिळोदा रोडलगत मोटारसायकल लावून गप्पा मारत असताना तीस ते पस्तीस वयोगटातील दोन तरुणांनी अचानक तरुणाच्या कानाजवळ बंदूक लावली व त्याच्या खिशातील 2 हजार 60 रुपये व सहा हजार रुपयांचा मोबाईल हिसकावला. नंतर त्यांनी तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडित तरुणीने फैजपूर पोलिसात फिर्याद दिली असून, दोन अनोळखी तरुणांविरुद्ध बलात्कार व अवैधरीत्या शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी पीडितेचा प्रियकर शुभम बारसे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: rape on girl