विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर तीनवेळा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पाचोरा पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, रमेश परदेशी यांच्या २३ वर्षीय मुलीचा विवाह मार्च २०१८ मध्ये देवपुर (धुळे) येथील विनोद भगवान मोरे याच्याशी निश्चित करण्यात आला होता. लग्नाची तारीख निश्चित होणे बाकी होते. मोबाईलमुळे युवक व युवतीत संभाषण वाढल्याने सदर युवती विनोद मोरे याचेसोबत औरंगाबाद येथे चार चाकी वाहनातुन गेली.

नांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी नांद्रा व औरंगाबाद रस्त्यावर तीनवेळा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हुंड्यात स्विफ्ट डिझायर (चार चाकी) गाडी द्याल तरच विवाह करतो असे सांगितले. मुलीकडील घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अखेर विवाह मोडला. याप्रकरणी देवपुर (धुळे) येथील युवकावर बलात्काराचा तर तिघांवर पाचोरा पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचोरा पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, रमेश परदेशी यांच्या २३ वर्षीय मुलीचा विवाह मार्च २०१८ मध्ये देवपुर (धुळे) येथील विनोद भगवान मोरे याच्याशी निश्चित करण्यात आला होता. लग्नाची तारीख निश्चित होणे बाकी होते. मोबाईलमुळे युवक व युवतीत संभाषण वाढल्याने सदर युवती विनोद मोरे याचेसोबत औरंगाबाद येथे चार चाकी वाहनातुन गेली. त्यानंतर दोघांमध्ये अधिकच जवळीक वाढल्याने 1 ते २३ आॅक्टोबर दरम्यान विनोद मोरे हा नांद्रा येथे मुक्कामी राहुन होणारी पत्नी (युवती) हिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. विवाहाची तारीख काढण्यासाठी बैठक बसल्यानंतर विनोद आणि त्याचे घरच्यांनी थेट विवाहात स्विफ्ट डिझायर (चार चाकी) गाडी द्याल तरच आम्ही विवाहाची तारीख नक्की करतो असे सांगून उठुन गेले.

यानंतर इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह जुऴविण्यासाठी दोनवेळा बैठकाही घेण्यात आल्या. मात्र वराकडील मंडळी हुंड्यात चार चाकी वाहन मागल्यावर अडुन बसल्याने व वधुकडील मंडळींची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने अखेर विवाह मोडला गेला. यामुळे युवतीने विनोद भगवान मोरे, भगवान भाऊलाल मोरे, सुंदरबाई भगवान मोरे, सोनम भगवान मोरे राहणार सर्व देवपुर (धुळे) यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात हुंडाबळी व बलात्काराचा गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे हे करीत आहेत.

Web Title: rape on a woman with a bait of marriage in Jalgaon