राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पंथसंचलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

विजयादशमी निमित्त मालेगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष सदंड पथसंचलन करण्यात आले. संचलनात किमान 300 स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. पूर्ण संचलन घोषाच्या तालावर चालत होते. त्यामध्ये दंडधारी  स्वयंसेवक व मध्यस्थानी अश्वावर भगवाध्वज, घोष व अन्य स्वयंसेवक अश्या क्रमाने संचलन होते

मालेगाव : विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष सदंड पथसंचलन करण्यात आले. संचलनात किमान 300 स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. पूर्ण संचलन घोषाच्या तालावर चालत होते. त्यामध्ये दंडधारी  स्वयंसेवक व मध्यस्थानी अश्वावर भगवाध्वज, घोष व अन्य स्वयंसेवक अश्या क्रमाने संचलन होते. 

भगव्या ध्वजाला प्रणाम करून संचलनाची सुरवात

भुईकोट किल्ल्यापासून संचलनाला सुरवात झाली. भगव्या ध्वजाला प्रणाम व प्रार्थना करून संचलनाची सुरवात झाली. रामसेतू, संगमेश्वर, दत्तमंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल किदवाई रोड, पाच कंदिल, टिळकरोड, तांबा काटा, गुळबाजार या मार्गाने संचलन काढण्यात आले. यावेळी नागरिकांनी जागो जागी रांगोळी, पुष्प वर्षाव व भारत माता की जय, वंदे मातरम सदर घोषणा देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे मुख्यशिक्षक म्हणून राकेश मालपुरे तर प्रार्थना प्रमुख चिरंजीव सानप होते. शहर संघचालक अशोक कांकरिया, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, शहर कार्यवाह अतुल शिरोडे व जेष्ठ स्वयंसेवक बाळासाहेब बोहाडे, बन्सीलाल कांकरिया, गोविंद तापडिया, सतीश कजवाडकर, भोगीलाल पटेल, भरत शहा, भानू कुलकर्णी, सुभाष बाकरे, सोहनलालजी जैन, आदी स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Rashtriya Swayamsevak Sangh organized the cult movement